Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांना पत्र; आतिशी यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याची मागितली परवानगी
दिल्लीतील त्यांच्या जागी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याबाबत त्यांनी पत्र लिहिले आहे.
Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर तिहार जेलमधून लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. दिल्लीतील त्यांच्या जागी राष्ट्रीय ध्वज फडकवण्याबाबत त्यांनी पत्र लिहिले आहे. पत्रात 'आतिशी मारलेना 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या जागी ध्वज फडकावतील,' असे त्यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात आतिशीला त्यांच्या जागी राष्ट्रीय ध्वज फडकवतील अशी परवानगी देण्याची विनंती केजरीवाल यांनी पत्राद्वारे केली होती.
अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेल्या पत्राबाबत AAP ने बुधवारी माहिती दिली. कथित दारू धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. दरवर्षी, छत्रसाल स्टेडियमवर दिल्ली सरकारचा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम आयोजित केला जातो आणि केजरीवाल संमेलनाला संबोधित करतात. मात्र, यंदा अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये असल्याने ते शक्य नाही. दरम्यान, दिल्ली दारू धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकताच उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. आता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. सीबीआय प्रकरणात अटक बेकायदेशीर ठरवणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे. यासोबतच केजरीवाल यांचा अंतरिम जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. उच्च न्यायालयाने जामिनासाठी खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.