IPL Auction 2025 Live

Court Grants Some Concessions To Kejriwal: CBI कोठडीत अरविंद केजरीवाल भगवद्गीता वाचणार आणि घरी बनवलेले अन्न खाणार; न्यायालयाकडून केजरीवाल यांना सवलती मंजूर

Arvind Kejriwal | PTI

Court Grants Some Concessions To Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना बुधवारी दारू धोरण प्रकरणी (Liquor Policy Case) तीन दिवसांची सीबीआय कोठडी (CBI Custody) सुनावण्यात आली. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने (Delhi's Rouse Avenue Court) केजरीवाल यांची कोठडी तपास यंत्रणेला दिली आहे. तसेच कोठडीच्या कालावधीत काही सवलती देण्याची त्यांची विनंतीही मान्य केली. अटकेदरम्यान न्यायालयाने केजरीवाल यांना त्यांचा चष्मा ठेवण्याची, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेण्याची, घरी बनवलेले अन्न खाण्याची, भगवद्गीतेची प्रत घेण्याची आणि त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांना दररोज एक तास भेटण्याची परवानगी दिली आहे.

आप सुप्रिमोने न्यायालयाला सांगितले की, ते दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी गीता वाचतात. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी बेल्ट देण्याची विनंती केली कारण त्यांना तिहार तुरुंगात जाताना त्यांची पँट धरावी लागली, जी त्यांना अत्यंत लज्जास्पद गोष्ट वाटली. मात्र, विशेष न्यायाधीश अमिताभ रावत यांनी ही विनंती मान्य केली नाही. (हेही वाचा - President Droupadi Murmu Parliament Speech: 'आणीबाणी हा राज्यघटनेवरील सर्वात मोठा हल्ला होता'; संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती मुर्मू यांचे वक्तव्य)

केजरीवाल यांना 29 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत न्यायालयात हजर केले जाईल. बुधवारी सीबीआयने औपचारिकपणे केजरीवाल यांना अटक केली. आम आदमी पार्टीने संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. आपचे सरचिटणीस (संघटना) आणि राज्यसभा सदस्य संदीप पाठक यांनी केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजपवर टीका केली. (वाचा - Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामिनास स्थगिती; आपच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण)

केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना कथित अबकारी धोरण घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अटक केली. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं. ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित सरकारचे प्राधान्यक्रम मांडले. अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या संयुक्त बैठकीत मुर्मू यांचे हे पहिलेच भाषण असेल.