PM Modi Arrives In Abu Dhabi: पंतप्रधान मोदींचे अबुधाबीत आगमन; UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद यांच्याशी करणार चर्चा

ती आणखी खास बनली कारण मला बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. भारतीय तुकडी पाहून आम्हाला अभिमान वाटला. परेड अप्रतिम होती. मी राष्ट्राध्यक्ष @EmmanuelMacron आणि फ्रेंच लोकांच्या आदरातिथ्याबद्दल आभारी आहे. मैत्री अशीच वाढत राहो!

PM Modi And UAE President Sheikh Mohamed (PC - ANI)

PM Modi Arrives In Abu Dhabi: पंतप्रधान मोदी शनिवारी त्यांच्या अधिकृत दौऱ्यासाठी अबुधाबी, UAE येथे पोहोचले आहेत. त्यांचे आगमन होताच राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (UAE President Sheikh Mohamed bin Zayed Zayed Al Nahyan) यांनी त्यांचे स्वागत केले. प्रमुख द्विपक्षीय मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी (PM Modi) शेख नाह्यान यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. दोन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्याची सांगता केल्यानंतर पंतप्रधान शनिवारी यूएई (UAE) ला रवाना झाले. बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाल्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्यांची फ्रान्स भेट संस्मरणीय असल्याचे म्हटले. त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फ्रान्सच्या लोकांचे प्रेम आणि आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटलं आहे की, ही फ्रान्स भेट एक संस्मरणीय ठरली. ती आणखी खास बनली कारण मला बॅस्टिल डे सेलिब्रेशनमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. भारतीय तुकडी पाहून आम्हाला अभिमान वाटला. परेड अप्रतिम होती. मी राष्ट्राध्यक्ष @EmmanuelMacron आणि फ्रेंच लोकांच्या आदरातिथ्याबद्दल आभारी आहे. मैत्री अशीच वाढत राहो! (हेही वाचा -Grand Cross of the Legion: भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांना फ्रांसचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव)

फ्रान्सच्या दोन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे सोहळ्यात सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून त्यांनी फ्रान्सला भेट दिली. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त, लष्करी बँडच्या नेतृत्वाखाली 241-सदस्यीय त्रि-सेवेच्या भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडीनेही परेडमध्ये भाग घेतला, असं PMO ने एका निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधानांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचीही बैठक घेतली आणि संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेतला. पीएम मोदी आणि मॅक्रॉन यांनी व्यावसायिक सहकार्यामध्ये विविधता आणण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी शीर्ष सीईओंची देखील भेट घेतली. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "माझे मित्र, अध्यक्ष @EmmanuelMacron यांच्याशी झालेली चर्चा अतिशय फलदायी ठरली. आम्ही भारत-फ्रान्स संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा आढावा घेतला. ग्रीन हायड्रोजन, यांसारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी मी विशेषतः उत्साही आहे."

पंतप्रधान मोदी आणि यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायादल नयन यांची अखेरची भेट जूनमध्ये अबू धाबीमध्ये झाली होती, जेव्हा पंतप्रधान म्युनिकमधील G7 शिखर परिषदेतून परतताना यूएईला गेले होते.