राजस्थान सह काही शहरांमध्ये भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

सीकर, अलवर, भरतपूर आणि आजूबाजूच्या शहरांत तुम्हाला भुकंपाचे झटके बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Representational Image |(Photo Credits PTI)

रविवारी (17 मार्च) पहाटे राजस्थानच्या काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सीकर, अलवर, भरतपूर आणि आजूबाजूच्या शहरांत तुम्हाला भुकंपाचे झटके बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वृत्तानुसार, भूकंपाची तीव्रता 5.11 रिश्टल स्केल इतकी होती. मात्र यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.

या भूकंपाचा परिणाम भारत, पाकिस्तान शिवाय इराण आणि अफणागिस्तान येथेही झआला. राजस्थान मध्ये पहाटे सुमारे 5:30 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. यामुळे काही घरांना तडे गेले आहेत.

शनिवारी (16 मार्च) निकोबार महाद्वीप वर देखील भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टल स्केल इतकी होती. यापूर्वी 20 फेब्रुवारीला देशातील काही भागात भूकंपाची कंपने जाणवली होती. दिल्लीसह महाराष्ट्रातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.