Viral Video: ओडिशात डिनर पार्टीदरम्यान स्टेजवर गाताना हृदयविकाराच्या झटक्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा मृत्यू, पहा व्हिडिओ

वृत्तानुसार, घटनेनंतर लगेचच अधिकाऱ्याला परलाखेमुंडी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना बर्हमपूर एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले.

Additional Collector dies of heart attack (PC - X/@ArgusNews_in)

Viral Video: ओडिशातील (Odisha) गजपती जिल्ह्यात (Paralakhemundi District) स्टेजवर गाताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अतिरिक्त जिल्हाधिकारी कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिरेंद्र दास हे परालखेमुंडी येथील ब्रुंदाबन राजवाड्यात जगन्नाथ भजन गात होते, जिथे ही दुर्घटना घडली. याठिकाणी एका डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये, दास स्टेजवर उभा राहून भजन गाताना दिसत आहे.

वृत्तानुसार, घटनेनंतर लगेचच अधिकाऱ्याला परलाखेमुंडी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना बर्हमपूर एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले. (हेही वाचा - 3 Deaths By Heart Attack in UP: अमरोह जिल्ह्यात लग्नसोहळ्यात शोककळा, दोन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)

पहा व्हिडिओ -

एमकेसीजी रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दास यांच्या निधनानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या दुःखद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, दास हे एक उत्कृष्ट नोकरशहा होते ज्यांनी नेहमीच सामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif