Atiq And Ashraf Murder: अतिक आणि अश्रफ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनाही धोका? तिन्ही मारेकऱ्यांना नैनी कारागृहातून प्रतापगडला हलवण्यात आलं
लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी अशी अतिक आणि अशरफवर हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत.
Atiq And Ashraf Murder: माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अशरफ (Ashraf) या तिघांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तिन्ही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी अटक केली. त्यानंतर त्यांना नैनी कारागृहात ठेवण्यात आले होते, मात्र आता तिन्ही आरोपींच्या जीवाला धोका असल्याने त्यांना नैनी कारागृहातून प्रतापगड कारागृहात हलवण्यात आले आहे. लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी अशी अतिक आणि अशरफवर हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत.
आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले की, माफिया अतिकचे पाकिस्तानशी संबंध होते. त्याने आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी अनेक निष्पाप लोकांची हत्या केली होती. जमीन हडप करण्यासाठी अतिक मारायचा आणि त्याच्याविरुद्ध साक्ष देणाऱ्यांनाही सोडत नव्हता. त्याचा भाऊ अशरफही हे कृत्य करायचा, म्हणून आम्ही दोघांची हत्या केली, असा जबाब आरोपींनी दिला आहे. (हेही वाचा - Atiq Ahmed Murder Case: अतिक अहमद आणि त्याच्या भावाच्या मारेकऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)
दरम्यान, या तिन्ही मारेकऱ्यांवर यापूर्वी वेगवेगळ्या घटनामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी प्रयागराजमध्ये कधी आणि कसे आले याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्याचे स्थानिक मदतनीस कोण आहेत? लवलेश तिवारी हा बांदा, सनी जुन्या हमीरपूरचा आणि अरुण मौर्य कासगंजचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
या खळबळजनक हत्याकांडाचा तपास करण्यासाठी राज्य पोलिसांकडून दोन विशेष तपास पथके (एसआयटी) तयार करण्यात येणार आहेत. पत्रकार म्हणून भासवणाऱ्या हल्लेखोरांनी हत्येनंतर 'जय श्री राम'चा नारा दिला आणि पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शूटर्सकडे तीन बनावट मीडिया ओळखपत्र, एक मायक्रोफोन आणि कॅमेरा आणला होता. या घटनेत लवलेश जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागल्याने त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.