Bihar Stampede: बिहार येथील सिध्दनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात जणांचा मृत्यू,नऊ जखमी (Watch Video)
या घटनेत अद्याप सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण नऊ जण जखमी झाले आहे.
Bihar Stampede: बिहार येथील जेहानाबाद जिल्ह्यातील मखदमपूर येथील बाबा सिध्दनाथ मंदिरात सोमवारी पहाटे चेंगराचेंगरी (Stampede) झाली. या घटनेत अद्याप सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण नऊ जण जखमी झाले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा- राजस्थानच्या भरतपूरमध्ये भीषण अपघात, नदीत बुडून 7 तरुणांचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी हजारो भक्त सिध्दनाथ बाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळीस अचानक मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एकूण सात जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले अशी जेहानाबाद येथील पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही या सर्व गोंष्टीवर लक्ष ठेवून आहे.
एएनआयशी बोलताना दिवाकर कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळी डीएम आणि एसपी यांनी घटनास्थळी भेट घेतली आहे. ते परिस्थितीचा आढावा घेत आहे. एकुण सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाशी भेट दिली आहे. चौकशी करत आहे. जे मरण पावले आहे त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.