RAW Officer Committed Suicide: दिल्लीत RAW अधिकाऱ्याने 10 व्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

मात्र, याबाबत आत्ताच निश्चित काहीही सांगता येणार नाही.

Suicide | (Photo Credits: Pixabay)

RAW Officer Committed Suicide: दिल्लीत रॉ (Research And Analysis Wing) अधिकाऱ्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. रॉ अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या लोधी रोड येथे RAW चे कार्यालय आहे. अधिकाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, ते गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. मात्र, याबाबत आत्ताच निश्चित काहीही सांगता येणार नाही. रॉ अधिकाऱ्याच्या मृत्यूची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तपास करण्यात येत आहे. RAW अधिकारी त्यांच्या कामामुळे नैराश्यात होते की त्यांच्या काही कौटुंबिक समस्या होत्या ज्यामुळे ते नैराश्यात होते? याबाबत आत्तापर्यंत काहीही ठोस माहिती मिळालेली नाही.

कार्यालयाच्या 10व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर रॉ अधिकारी थेट जमिनीवर पडला. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सध्या रॉ अधिकाऱ्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. रॉ अधिकाऱ्याने कार्यालयात असे पाऊल उचलल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे काम करणाऱ्या इतर लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. (हेही वाचा -Aftab Killed Shraddha: आफताबने केली गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या; मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, 6 महिन्यांनंतर झाला खुलासा)

यावर्षी सप्टेंबर महिन्यात सीबीआय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले होते. सीबीआयच्या कायदेशीर सल्लागाराचा मृतदेह त्यांच्या दक्षिण दिल्लीतील निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. सीबीआयच्या लोधी रोड कार्यालयात उप विधी सल्लागार म्हणून तैनात जितेंद्र कुमार हे मूळचे हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील होते. मृत्यूनंतर एक सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरले नव्हते.

IRS अधिकाऱ्याने केली होती आत्महत्या -

त्याचप्रमाणे 2020 मध्ये एका IRS अधिकाऱ्याने दिल्लीत गळफास लावून आत्महत्या केली होती. दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात राहणारे आयआरएस अधिकारी आयकरचे मुख्य आयुक्त म्हणून नियुक्त होते.