Jammu-Kashmir Update: नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न फसला, भारतीय लष्कराकडून एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

जम्मूमधील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री पूंछमधील नियंत्रण रेषेजवळील सीमा कुंपणाजवळ घुसखोरांच्या संशयास्पद हालचाली सैनिकांना दिसल्या.

Indian Army प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

रविवारी पहाटे जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ (Pooch) जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LOC) घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडताना लष्कराच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला (Intruder) ठार केले. लष्कराच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. शाहपूर (Shahpur) सेक्टरमध्ये पहाटे 2.15 च्या सुमारास तीन संशयित दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला, जेव्हा नियंत्रण रेषेचे रक्षण करणार्‍या लष्कराच्या जवानांनी घुसखोरांना भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करताना पाहिले आणि त्यांच्यावर गोळीबार केला, असे प्रवक्त्याने सांगितले.

जम्मूमधील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री पूंछमधील नियंत्रण रेषेजवळील सीमा कुंपणाजवळ घुसखोरांच्या संशयास्पद हालचाली सैनिकांना दिसल्या. लेफ्टनंट कर्नल आनंद यांच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन दरम्यान गोळीबाराच्या ठिकाणी एक मृतदेह सापडला आणि इतर घुसखोर जंगलात पळून गेले. हेही वाचा Kolkata Crime: घराखाली दारू पिण्यावरून दोन गटांमध्ये वाद, हाणामारीत एकाचा मृत्यू

परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे आणि घुसखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. अधिका-यांनी सांगितले की, घेरलेल्या भागात आणखी दोन पाकिस्तानी घुसखोर असल्याचा लष्कराला संशय आहे. अलीकडच्या काळात लष्कराने नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. वृत्तानुसार, 15-16 फेब्रुवारीच्या मध्यरात्री, तीन दहशतवादी तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरी करत होते, तेव्हा घटनास्थळी तैनात असलेल्या जवानांनी घुसखोरीविरोधी ग्रिड कारवाई केली.

नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी आणि जवानांमध्ये गोळीबार झाला. त्यादरम्यान एक घुसखोर ठार झाला, तर कमी प्रकाशाचा फायदा घेऊन दोघे फरार झाले. ठार झालेल्या घुसखोराकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी 7 जानेवारी रोजी पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील बालाकोट सेक्टरमधून दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. एलओसीवर तैनात असलेल्या जवानांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. सैनिकांनी आपले जाळे पसरवले. घुसखोरांनी स्फोट घडवून घुसखोरीचा प्रयत्न केला मात्र लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या दिवशी शोध मोहिमेत शस्त्रास्त्रांसह दोन मृतदेह सापडले.