Andhra Pradesh Shocker: शाळेतच्या बाथरुमध्ये अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, पीडितेची प्रकृती गंभीर, आंध्र प्रदेशातील घटना

एका अल्पवयीन मुलीने शाळेत एका बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

Baby (File Image)

Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशातील कोटापटनम येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीने शाळेत एका बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. मुलीची अवस्था गंभीर असल्याने तीला राजिव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे दाखल केले आहे. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे. दुर्दैवाने नवजात बाळाचा मृत्यू झाला. (हेही वाचा- मोबाईल, टीव्हीवर निर्बंध लावलण्याने मुलांची पालकांविरुध्दात तक्रार; 7 वर्षाची शिक्षा होण्याची शक्यता)

मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी कोटापटनम येथील रहिवासी आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची विद्यार्थिनी असून ती चीमाकुर्ती मंडाळात राहते. मुलगी गर्भवती असून नियमित शाळेत यायची. शाळेचे अधिकारी आणि मुख्यध्यापकांना तिच्या गरोदरपणाबद्दल  माहिती नव्हती. ही घटना बुधवारी ३१ जुलै रोजी घडली.

बुधवारी जेव्हा मुलीला भरपूर वेदना होऊ लागल्या त्यावेळीस तीने बाथरुममध्ये धाव घेतला. यासंदर्भात तीने कोणालाच माहिती दिली नाही. बराच ती वर्गाबाहेर असल्यामुळे तीच्या मैत्रिणींनी शोधण्यास सुरुवात केली. शेवटी ती एका बाथरूममध्ये बेशुध्द अवस्थेत सापडली. तेथे एका बाळाला जन्म दिल्याचे दिसले. या घटनेची माहिती मैत्रीणींनी शिक्षकांना दिली.

शिक्षकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरु केले. परंतु नवजात बाळाची प्रकृती नाजूक असल्याचे त्याचा मृत्यू झाला. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.