Family Suicide In Bhopal: भोपाळ मधील एका कुंटूबियाने केली सामुहिक आत्महत्या, कर्ज फेडू न शकल्यामुळे घेतला टोकाचा निर्णय

जोडप्यानं दोन मुलांना विष दिलं. त्यानंतर स्वत: गळफास घेतला

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Family Suicide In Bhopal: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे एका कुटूंबान एकाच वेळी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती पत्नी सह लहान मुलांचा देखील मृतदेह घरात सापडला आहे. पती पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केली तर लहान मुलांना विष देऊन संपवण्यात आल्याचे समोर आले आहे. नीलबड कॉलनीत राहणारे हे कुटूंब होत.  कर्ज  असल्यामुळे दाम्पत्यांनी मुलांसोबत जीवन संपवले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रातीगढ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे. पोलीसांनी घरात तपास सुरु केल्या त्यानंतर त्याना सुसाईट नोट सापडली आहे. त्यात त्यांनी ऑनलाईन लोनमध्ये कंगाल झाल्याचे लिहले होते. पोलीसांना तपासादरम्यान सल्फरच्या गोळ्यांची पाकिटं आढळली आहेत. पोलीसांनी महत्त्वाच्या गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.  भूपेंद्र विश्वकर्मा (38), रितू (35), ऋतुराज (9) आणि ऋषीराज (3) अशी मृतांची नावं आहेत.  एका खासगी विमा कंपनीत काम करत माहिती समोर आली आहे. डोक्यावर कर्ज एवढं आले असताना त्यांनी हे पाउल उचलले.

कर्जबाजारीपणाला कंटाळून सहकुटूंब त्यांनी जीवन संपवले. पोलीसांनी सर्व मृत देह ताब्यात घेवून पोस्टर्माटमसाठी पाठवले आहेत. सुसाईट नोटमध्ये त्यांनी ऑनलाईन काम करत असल्याचे उल्लेख केला आहे. सुरुवातीला पैसे कमवले परंतू काही दिवसांनी त्या कामावरुन त्याला कर्ज घेण्यास सांगितले आणि कर्ज घेतल्यानंतर फेडायचं कसं हाच प्रश्न नेहमी त्रास देवू लागला त्यामुळे सर्वांची माफी मागत त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.