Train Accident in Arunachal Pradesh: रुळ ओलांडताना कारला रेल्वेची धडक, एकाचा जागीच मृत्यू
या धडकेत ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आणखी एक जण जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.५० च्या सुमारास घडली.
Train Accident in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशआतील लोअर सियांग जिल्ह्यात रुळ ओलांडताना एका कारला रेल्वेची धडक लागली. या धडकेत ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आणखी एक जण जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.५० च्या सुमारास घडली. (हेही वाचा- टायर फुटल्याने कार उलटली, अपघातात कानपूर येथील उद्योगपतीच्या पत्नीचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, लोअर सियांग जिल्ह्यातील दिमोजवळील पाले येथे हा अपघात झाला. रेल्वे रुळ ओलांडत असताना समोर येणाऱ्या भरधाव रेल्वेने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अपघात झाला आणि ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आणखी एक जण जखमी झाला. अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली.
भारतीय राखीव बटालियनेचे उपनिरिक्षक रिगो रिबा असं मृताचे नाव आहे. रिगो रिबा हे कारमध्ये आपल्या नातवंडासोबत पूर्व सियांग जिल्ह्यातील पासीघाट येथे जात होते त्यावेळी हा अपघात घडला. त्यांची कार रेल्वे रुळ ओलांडत होते. त्यांवळी मुरकोंगसेलेक-तेजपूर स्पेशल ट्रेनने धडक दिली. आसाममधील तेजपूरमधील देकरगावच्या वाटेवर असलेल्या ट्रेनने कारला किमान 1 किमीपर्यंत ओढत नेले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या अपघातात रिगो रिबा यांचे जागीच मृत्यू झाला.