Uttar Pradesh Crime: लज्जास्पद! उत्तर प्रदेशमधील बरेली येथे 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, पीडितेचा मृत्यू

एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. बरेलीच्या नवाबगंजमध्ये मानवतेला लाजवेल अशी घटना समोर आली आहे.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Uttar Pradesh Crime: यूपीच्या बरेलीमधून एक घृनास्पद घटना समोर आली आहे. एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार (Old Woman Raped)झाला. या घटनेत महिलेचा मृत्यू (Old Woman Dies)झाला. बरेलीच्या (Bareilly Crime)नवाबगंजमध्ये माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 35 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. घटनेच्या तासाभरानंतर महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा:Madhya Pradesh: बोअरवेलमध्ये पडून ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना )

85 वर्षांची वृद्ध महिला तिच्या घरी एकटीच होती. दरम्यान, परिसरातील एका ३५ वर्षीय तरुणाने तिच्या घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. घटनेनंतर सुमारे तासाभरात महिलेचा मृत्यू झाला. वृद्ध महिलेसोबत हा प्रकार घडत असताना तिच्या कुटुंबातील एक महिला घटनास्थळी पोहोचली आणि आरोपी तरुणाला पाहून तिने आरडाओरडा केला. यादरम्यान तरुणाने घरातून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.(हेही वाचा: Wayanad Landslide: केरळमधील वायनाड येथे भूस्खलनात 6 ठार, अनेक अडकल्याची भिती)

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. मृताच्या मेहुण्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. एसपी ग्रामीण मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे, हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने परिसरातील रहिवासी 85 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची माहिती मिळाली. परिणामी महिलेचा मृत्यू झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif