Student Carrying Roadways Bus Overturns in Haryana: हरियाणातील पिंजोरजवळ बस उलटून भीषण अपघात; 40 शालेय विद्यार्थी जखमी
जखमी विद्यार्थ्यांना पिंजोर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Student Carrying Roadways Bus Overturns in Haryana: हरियाणातील पिंजोरजवळ बस उलटल्याने (Haryana School Bus Overturn)सुमारे 40 शालेय विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना पिंजोर येथील शासकीय रुग्णालयात दाखल (Students Admitted in Hospital)करण्यात आले आहे. सोमवारी नव्या आठवड्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली. जखमी विद्यार्थ्यांना पंचकुलाच्या पिंजोर हॉस्पिटल आणि सेक्टर 6 सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर एका जखमी महिलेला पीजीआय चंदीगड येथे रेफर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उफचार सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (हेही वाचा: )
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हरियाणातील उन्हानी गावाजवळ शाळेच्या बसचा भीषण अपघात झाला. त्या दुर्घटनेमध्ये सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर, 12 मुले गंभीर जखमी झाली होती. ईद सणानिमित्त शासकीय सुटी असतानाही शाळा सुरू होती. त्यामळे ती घटना चांगलीच चर्चेत आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसचे फिटनेस सर्टिफिकेटही कालबाह्य झाले होते. फिटनेस सर्टिफिकेटशिवाय बसमधून मुलांना शाळेत नेण्याचे काम सुरू होते. तसेच चालक मद्यधुंद अवस्थेतच गाडी चालवत होता, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.
Visuals from Govt hospital, Pinjore