Delhi Shocking: दिल्लीतील मुकुंदपूरमध्ये पुराच्या पाण्यात आंघोळ करताना 3 मुलांचा बुडून मृत्यू

सध्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी संकट कायम आहे.

Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

Delhi Shocking: दिल्लीतील जहांगीरपूर येथे शुक्रवारी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. तिघेही एच ब्लॉकजवळ आंघोळीसाठी गेले होते. घटनास्थळी मेट्रोचे काम सुरू असताना पावसामुळे तेथे तलाव तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये हे सर्वजण आंघोळीला गेले होते. पोलिसांनी सांगितले की, तिघेही दुपारी आंघोळीसाठी गेले होते. आशिष, निखिल आणि पियुष अशी मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेही इथपर्यंत कसे पोहोचले आणि त्यांच्यासोबत हा प्रकार कसा घडला, याचा तपास सुरू आहे.

दुसरीकडे, गेल्या चार दिवसांपासून यमुनेच्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाल्याने दिल्लीकरांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी संकट कायम आहे. (हेही वाचा -Bengaluru Road Rage Video: बेंगलूरू मध्ये 4 तरूणांनी दिवसाढवळ्या कार चालकासोबत बेशिस्त वर्तन करत केलं गाडीचं नुकसान; सारा प्रकार कॅमेर्‍यात कैद (Watch Video))

मुसळधार पावसानंतर दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचा प्रवाह कायम आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक भागात परिस्थिती बिकट झाली आहे. सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी आयटीओसह विविध ठिकाणी यमुनेला भेट दिली. यादरम्यान नायब राज्यपाल म्हणाले की, लष्कर, एनडीआरएफ, दिल्ली जल बोर्ड, पाटबंधारे आणि पूर विभाग आणि दिल्ली सरकारचे इतर विभाग दिल्लीतील पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर एकत्र काम करत आहेत. येत्या चार ते पाच तासांत त्याचा परिणामही दिसून येईल.