Bihar Shocker: मौर्य एक्स्प्रेसच्या 3 एसी डब्यांमध्ये प्रवाशांना बेशुद्ध करून लाखोंचा माल चोरी; झारखंडहून यूपीला जात होती ट्रेन
त्यांनी सांगितले की, सर्वप्रथम मी ऑनलाइन तक्रार नोंदवली. ज्यावर मला सिवान स्टेशन गाठून लेखी तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला.
Bihar Shocker: मौर्य एक्स्प्रेस (Maurya Express) च्या तीन एसी डब्यांमध्ये (AC Coaches) चोरट्यांनी मोठा डल्ला मारला. चोरट्यांनी लाखोंचा ऐवज पळवला. प्राप्त माहितीनुसार, सिवान आणि छपरा येथील प्रवासी हटियाहून गोरखपूरला जाणाऱ्या मौर्या एक्सप्रेस A1, A2, B5 या कोचमध्ये प्रवास करत होते. त्या ट्रेनमध्ये दक्षिण टोला येथील रहिवासी असलेले सिवान येथील अजितकुमार दुबे हे कुटुंबासह A2 मध्ये प्रवास करत होते. जसिडीह नंतर ट्रेन बधिया येथे पोहोचली तेव्हा सकाळचे सुमारे 6 वाजले होते. त्यांना जाग येताच त्यांनी पत्नीला उठवले आणि सामानाची दुरवस्था झाल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांची पर्स तपासली, त्यातील मोबाईल, एटीएम कार्ड आणि सुमारे 20 हजार रुपये रोख गायब होते. बर्थ क्रमांक 16 वर प्रवास करत असताना, छपराच्या नुरुल आफरीन खानलाही तिच्या फोनसह अनेक मौल्यवान वस्तू गहाळ आढळल्या.
या घटनेमुळे प्रभावित आणखी एक व्यक्ती अजित कुमार यांनी सांगितले की, आम्हाला वाटेत तक्रार करता आली नाही, म्हणून आम्ही सिवान रेल्वे स्टेशनवर आलो आणि तेथे तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितले की, सर्वप्रथम मी ऑनलाइन तक्रार नोंदवली. ज्यावर मला सिवान स्टेशन गाठून लेखी तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. (हही वाचा -Jharkhand Shocker: रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॅम्पसमध्ये सापडला वैद्यकीय विद्यार्थ्याचा अर्धवट जळालेला मृतदेह, चौकशी सुरू)
या घटनेबाबत बोलताना हरि सिंह यांनी सांगितले की, तीन-चार डब्यातील प्रवाशांचे सामान चोरीला गेले आहे. घटनेच्या वेळी सर्व कर्मचारी झोपले होते. चोरट्यांनी एवढी मोठी चोरी केली तरी एस्कॉर्ट पार्टी आणि कोच अटेंडंटला याची कल्पनाही नव्हती, हे कसं घडलं.
या प्रकरणी रेल्वेचे एसपी मुझफ्फरपूर डॉ. कुमार आशिष यांनी सांगितले की, पीडित प्रवाशांचे अर्ज त्या भागातील पोलिस स्टेशनला पाठवले जातील आणि तेथे या प्रकरणाची चौकशी केली जाईल.