Corona Update In India Today: भारतात कोरोना विषाणूचा हाहाकार; देशात आज 2 हजार 487 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण 83 जणांचा मृत्यू

कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतातही कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना विषाणूने (Coronavirus) भारतासह संपूर्ण जगाला (India) हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या भारतातही कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. देशात आतापर्यंत 1306 लोकांचा मृत्यू तर, एकूण 40 हजार 263 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, कोरोना विषाणूचे जाळे पसरत चालत असल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.  रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांची यादी

जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 34 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 10 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 40 हजार 263 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 1 हजार 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 हजार 887 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, देशात गेल्या 24 तासात 2 हजार 487 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 83 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कोविड वॉरिअर्सवर पुष्पवृष्टी केल्याने उपस्थितीत केले प्रश्नचिन्ह

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif