Srinagar Encounter: श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश
2 अज्ञात दहशतवाद्यांना मारण्यात पोलिसांना यश आले आहे.
श्रीनगरमधील (Srinagar) दानमार(Danmar) भागात झालेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दल(CRPF) आणि दहशतवाद्यांमध्ये(Terrorist) सुरु चकमक सुरू होती. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचे(Lashkar a Toyba) दोन दहशतवादी मारले गेल्याची माहिती आधिकाऱ्यांना दिली आहे.
ट्विटरवरुन काश्मीर झोन पोलिसांनी (Kashmir Police) म्हटले आहे की, आज पहाटे दानमार परिसरातील आलमदार कॉलनी (Alamdar colony) येथे चकमकीला सुरुवात झाली. 2 अज्ञात दहशतवाद्यांना मारण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच भागात अन्य दहशतवाद्यांचा शोध चालू आहे. अशी माहिती ट्विट करत पोलिसांनी दिली आहे. अनेक सूचनांनंतर या भागात सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांच्या दरम्यान आठवड्याच्या सुरुवातीलाही चकमक झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीनगरच्या दानमार भागात आलमदार कॉलनी येथे चकमक सुरू होती. पोलिस आणि सुरक्षा दल त्यांची भुमिका उत्तमप्रकारे पार पाडत आहे. या चकमकीबाबतची अधिक माहिती आम्ही लवकरच जाहीर करू असे स्पष्टीकरण जम्मू काश्मीर पोलिसांनी दिले. श्रीनगरच्या ईदघा परिसरातील दानमार सय्यदपोरा येथे दोन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सैन्याच्या संयुक्त पथकाने त्यांची शोधमोहीम सुरु केली. सैन्याच्या संयुक्त पथकाने संशयित जागेला घेराव घातला. तेथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. यानंतर पलटवार करण्यासाठी पोलिसांनी गोळ्या झाडायला सुरूवात केली. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस यशस्वी ठरले.
काश्मीर खोऱ्यात गेल्या 15 दिवसातील ही 7 वी चकमक आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार केंद्रशासित प्रदेशात यावर्षी 91 दहशतवादी ठार झाले आहेत. यापूर्वी बुधवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा शहरात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. एका दहशतवाद्याची ओळख पाकिस्तानी लष्कर-ए-तोयबा कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरा अशी होती. तर शहनावाज आणि अन्य एक अज्ञात दहशतवादी असे स्थानिक दहशतवादी होते. काश्मीरमधील एकंदर सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिस, सैन्य आणि सीएपीएफ यांच्यात गुरुवारी डीजीपी जम्मू-काश्मीर दिलबाग सिंग यांनी बैठक घेतली होती. मात्र आशा चकमकी वारंवार होत असल्याने येथील रहिवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न नक्कीच उद्भवतो. यावर सरकारने योग्य तो निर्णय घेऊन तोडगा काढणे गरजेचे आहे.