Kashmiri Pandit Teachers Transferred Out Of Valley: काश्मीर खोऱ्यातून 177 काश्मिरी पंडित शिक्षकांच्या बदल्या
त्यांनी अशांत केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर काश्मिरी पंडित शिक्षकांच्या बदलीचे आदेश आले आहेत.
Kashmiri Pandit Teachers Transferred Out Of Valley: काश्मीरमधील हिंदूंच्या हत्येतील चिंताजनक वाढीदरम्यान, सरकारने श्रीनगरमध्ये तैनात असलेल्या 177 काश्मिरी पंडित शिक्षकांच्या बदलीचे (Kashmiri Pandit Teachers Transferred) आदेश दिले. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. काश्मिरी पंडित समुदाय आणि स्थलांतरित कामगारांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यांनी अशांत केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीनंतर काश्मिरी पंडित शिक्षकांच्या बदलीचे आदेश आले आहेत. मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात 12 मे रोजी दहशतवाद्यांनी राहुल भटची हत्या केल्यानंतर पंतप्रधानांच्या विशेष पॅकेज अंतर्गत काम करणारे काश्मिरी पंडित स्तब्ध झाले आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून निषेध करत आहेत. सामूहिक निर्गमनाची धमकी देत आहेत. भट यांच्या हत्येनंतर सुमारे 6 हजार कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. त्यांनी खोऱ्याबाहेर बदलीची मागणी केली आहे. (हेही वाचा - Lok Sabha and Vidhan Sabha By-Elections: लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा; जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट)
गुरुवारी काश्मीरमध्ये दोन लोकांचा (एक बँक कर्मचारी आणि एक वीटभट्टी कामगार) मृत्यू झाला. जम्मू विभागातील सांबा जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेची मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील एका शाळेत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. 18 मे रोजी, दहशतवाद्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे दारूच्या दुकानात प्रवेश केला आणि ग्रेनेड फेकून जम्मू प्रदेशातील एकाचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले.
दरम्यान, पोलीस कर्मचारी सैफुल्लाह कादरी यांची 24 मे रोजी श्रीनगरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, तर दूरचित्रवाणी कलाकार अमरीन भट यांची दोन दिवसांनी बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.