Bihar : बिहारमध्ये बनावटी दारूमुळे 16 जणांचा मृत्यू, याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

बिहारमधील पश्चिम चंपारण येथे विषारी दारू पिऊन 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारण (Champaran) येथे विषारी दारू (Alcohol ) पिऊन 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. याची नोंद लौरिया पोलिस ठाण्यात ( Lauria police station) करण्यात आली आहे. या मृत्यूप्रकरणी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दोन गावकी चौकीदारांना निलंबित करण्यात आले आहे. एप्रिल 2016 पासून राज्यात दारू पिणे, उत्पादन आणि व्यापार करण्यास मनाई आहे. यामुळे पोलिस कारवाईच्या भीतीने पीडित कुटुंबातील सदस्यांनी शांतपणे मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहे आहेत. असे समोर आले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत आठ जणांचा अनाकलनीय मृत्यू झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. जिल्हा कुटुंब दंडाधिकारी कुंदन कुमार (Kundan Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटूंबातील किंवा गावकऱ्यांपैकी कोणीही मद्यपान केल्याचा केलेला नाही.

नवीन कडक निषेध कायद्यांतर्गत 2016 मध्ये बिहारला मध्यपानमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले होते. यामुळे येथे दारू पिण्यावर कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र असे करताना कोणी आढळल्यास त्यावर पोलीस कारवाई होत असे. दरम्यान, याप्रकरणी मरण पावलेल्यांच्या कुटूंबातील सदस्यांसह पोलिसांनी सुमारे 40 जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

आरजेडी (RJD) पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी नितीशकुमार (Nitishkumar) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी ट्विट करत बिहारमध्ये सुशासन अंतर्गत दरवर्षी हजारो लोक विषारी मद्यपानामुळे मरत आहेत.  दारूबंदीच्या निर्णयाखाली, सत्ताधारी पक्षाचे लोक बिहारमध्ये 20,000 कोटींची समांतर बेकायदेशीर अर्थव्यवस्था चालवत आहेत. दारूबंदीच्या नावाखाली लाखो दलित आणि गरीब तुरूंगात आहेत. पोलिस भ्रष्ट व अत्याचारी झाले आहेत. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सीएम नितीशकुमार यांनी 2016 मध्ये राज्यात दारू निर्मिती, व्यापार आणि वापरावर बंदी घालणारा कायदा लागू केल्यापासून बिहारमध्ये बरीचशी संबंधित घटना घडल्या आहेत. कॉंग्रेसचे नेते आणि बिहारचे प्रभारी भक्त चरण दास यांनी बेतिया दारू घटनेची 'समांतर चौकशी' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची संख्या निश्चित करण्यासाठी एक टीम पाठवणार आहे. पथकाचे सदस्य मृतांच्या कुटुंबीयांना भेटतील. स्थानिक पोलिस तथ्य आणि कारणे लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच हा परिसर उपमुख्यमंत्री रेणू देवीचा (Renu Devi) आहे. त्यांनी लॉरिया ब्लॉकमधील बाधित गावांना भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी. मंगळवारी संध्याकाळी देउरवा आणि लगतच्या गावात नकली दारू पिण्याचे प्रकार उघडकीस आले.  गावक ऱ्यांनी बनावटी दारूचे मद्यपान केल्याने ते आजारी पडले. गुरुवारी पहिला मृत्यू झाला. देवरवा गावातील रहिवाशांनी असा आरोप केला आहे की गावात दारूची खुली विक्री होत असून जवळपासच्या गावातील लोकही तेथे दारू खरेदीसाठी येतात. अशी माहिती दास यांनी दिली. यावर्षी नुकताच कैमूर, मुझफ्फरपूर आणि नवादा या जिल्ह्यांमध्ये कमीतकमी 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now