Telangana Church Collapse Video: तेलंगणातील संगारेड्डी येथे बांधकामाधीन चर्च कोसळून एक ठार, नऊ जखमी

जखमी झालेल्या नऊ जणांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना कोहेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत इमारतीच्या सेंटरिंगचे काम सुरू असताना घडली.

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात (Telangana's Sangareddy District) रविवारी दुपारी बांधकाम सुरू असलेले चर्च कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या नऊ जणांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना कोहेडा पोलीस ठाण्याच्या (Koheda police station) हद्दीत इमारतीच्या सेंटरिंगचे काम सुरू असताना घडली. "ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे," असे संगारेड्डीचे एसपी रुपेश यांनी सांगितले.

पाहा पोस्ट -

"या घटनेत इतर आठ जणांना किरकोळ दुखापत झाली असून, या सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे," असेही त्यांनी सांगितले. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement