Happy Diwali 2019: Zee Marathi चे कलाकार सांगत आहेत त्यांचे ह्या वर्षीचे दिवाळी Plans

प्रत्येकाची दिवाळी वेगळी असते. आज आपण जाणून घेऊया 'झी मराठी' (Zee Marathi) वरील कलाकारांच्या दिवाळी बाबत. ते कशी साजरी करतात त्यांची दिवाळी.

Zee Marathi Celebrities (Instagram)

दिवाळी आली की सगळीकडेच उत्साहाचं वातावरण असतं. प्रत्येकाची दिवाळी वेगळी असते. आज आपण जाणून घेऊया 'झी मराठी' (Zee Marathi) वरील कलाकारांच्या दिवाळी बाबत. ते कशी साजरी करतात त्यांची दिवाळी.

हार्दिक जोशी (Hardik Joshi) (राणा, तुझ्यात जीव रंगला | झी मराठी)

यावेळी मी माझ्या घरी माझ्या परिवारासोबत हा सण साजरा करणार आहे. मी आईला घरी साफसफाईसाठी, फराळात चकल्या आणि शंकरपाळ्या करायला मदत करायचो पण गेली 3 वर्ष मालिकेमुळे मी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घरी जातो त्यामुळे ही मदत फारशी आता करता येत नाही. घरी मी दिवाळी ही पारंपरिक पद्धतीने साजरी करतो. पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून उटणं लावून अंघोळ करणं, मित्रपरिवाराला भेटणं त्यांच्या सोबत फराळाचा आस्वाद घेणं. आपण हा सण असाच पारंपरिक पद्धतीने साजरा केला पाहिजे जेणेकरुन पुढील पिढीमध्ये देखील हा सण सुट्टी म्हणून नाही तर एक सण म्हणून जिवंत राहील.

Hardik Joshi (Instagram)

प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) (येसूबाई, स्वराज्यरक्षक संभाजी | झी मराठी)

मी दिवाळी या सणाची खूप आतुरतेने वाट पाहते. स्वाराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या चित्रीकरणात मी खूपच व्यग्र आहे, त्यामुळे अजूनतरी मी या सणाची काहीच तयारी करू शकली नाहीये. मी खूप शॉपिंग करणार आहे. दिवाळी म्हटलं की फराळ आला. यावेळी मी करंजी आणि चकलीवर ताव मारणार आहे. चकली हा माझा आवडता पदार्थ आहे. दिवाळी आणि फटाके फोडणे हे समीकरणच आहे पण सध्याची पर्यावरणाची अवस्था बघता फटाके फोडू नका अशीच विनंती मी माझ्या चाहत्यांना करेन. तसंच या दिवाळीला गरजू लोकांमध्ये आनंद पसरवायचा प्रयत्न करूया आणि ही दिवाळी सगळ्यांसाठी आनंददायी बनवूया.

Prajakta Gaikwad (Instagram)

तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) (शुभ्रा, अगंबाई सासूबाई | झी मराठी)

माझ्याप्रमाणेच माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ व सेटवरचे लहान-मोठे कामगार या प्रत्येकाची ‘आपल्या घरची’ दिवाळी असते. मालिकांतून भूमिका करणारे आम्ही सगळे दररोज बारा-चौदा तास एकत्र असतो, त्यातून नवे भावबंध जुळतात, नाती तयार होतात, एक नवे घर वा कुटुंब आकाराला येते असे म्हटले तरी चालेल, अशा कुटुंबाची मग सेटवर दिवाळी साजरी करतो. हा एक नवा अनुभव असतो. यावर्षी ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेच्या बाबतीत असेच होईल. चित्रीकरणातून थोडा वेळ काढून मी माझ्या घरी जाऊन माझ्या आईबाबांसोबत देखील हा सण साजरा करेन.

Tejashree Pradhan (Instagram)

(हेही वाचा. जुईच्या 'प्रेमात' येऊ शकतो 'पॉइजन' मुळे 'पंगा'; पाहा काय म्हणते नागिणीची भूमिका साकारणारी शरयू सोनावणे)

तेजस बर्वे (Tejas Barve) (समर, मिसेस मुख्यमंत्री | झी मराठी)

यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे कारण मी मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि याच मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे आम्हाला ३ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. मालिकेच्या निमित्ताने घरापासून दूर असल्यामुळे मला खरेदीसाठी जास्त वेळ मिळणार नाहीये, त्यामुळे माझे कुटुंबीयच मला यावेळी सरप्राईज देणार आहेत आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. दिवाळी म्हटलं की खाण्याची चंगळ असते. मला फराळातील सर्व गोडाचे पदार्थ आवडतात, त्यातल्या त्यात मला बेसनाचे लाडू खूपच आवडतात. माझी आई बेसनाचे लाडू उत्तम बनवते त्यामुळे मी त्यावर ताव मारणार आहे.

Tejas Barve (Instagram)

तर ही होती काही कलाकारांनी दिवाळी बद्दल मांडलेली आपली मतं आणि त्यांच्या साजरा करण्याच्या पद्धती. तुम्हीही दिवाळीचा आनंद लुटा. मजा करा.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif