Welcome To The Jungle: 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल', पाहायला मिळणार जबरदस्त ॲक्शन सीन

सात दिवसांच्या शूटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, लोणावळा आदी ठिकाणांहून हे घोडे आणण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी निर्मात्यांनी 10 एकर जागेवर मोठा सेटही तयार केला आहे.

Welcome To The Jungle

Welcome To The Jungle: अक्षय कुमार, संजय दत्त, अनिल कपूर आणि रवीना टंडन अभिनीत आगामी विनोदी चित्रपट 'वेलकम टू द जंगल'च्या निर्मात्यांनी ॲक्शन सीनसाठी 200 घोडे वापरले आणि त्यासाठी अनेक घोडेस्वारांना बोलावले. सात दिवसांच्या शूटिंगसाठी मुंबई, महाबळेश्वर, लोणावळा आदी ठिकाणांहून हे घोडे आणण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी निर्मात्यांनी 10 एकर जागेवर मोठा सेटही तयार केला आहे. चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, "निर्मात्यांनी ॲक्शन सीक्वेन्ससाठी 200 हून अधिक घोडे सेटवर आणले होते. शूटिंगदरम्यान या सर्व घोड्यांची सुरक्षा पूर्णपणे सुनिश्चित करण्यात आली होती आणि सात दिवसांत सीन शूट करण्यात आले होते."

'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.