Watch Video: 'कपडे काढ आणि न्यूड वॉक करून दाखव' असे म्हणत इंटाग्रामवर शर्लिन चोप्राने शेअर केला धक्कादायक अनुभव

नुकताच शर्लिन चोप्रा हीने इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेंत आली आहे. शर्लिनने या व्हिडिओत तिच्या आयुष्यात घडलेला धक्कादायक अनुभव लोकांसोबत शेअर केला आहे.

Sherlyn Chopra (Photo Credit: Instagram)

शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओसाठी (Video) नेहमीच चर्चेत असते. नुकताच शर्लिन चोप्रा हीने इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेंत आली आहे. शर्लिनने या व्हिडिओत तिच्या आयुष्यात घडलेला धक्कादायक अनुभव लोकांसोबत शेअर केला आहे. लवकरच शर्लिन चोप्राच्या आायुष्यावर आधारीत द लास्ट विश ही शार्टफिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या शार्टफिल्मचा ट्रिझर शेअर करत दिलसे चाहता उसे, लेकीन उसनेही इज्जत की वाट लगा दी, असे शर्लिन म्हणाली आहे.

शर्लिन चोप्राच्या जीवनावर आधारीत द लास्ट विश शॉर्टफिल्म लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याच शॉर्टफिल्म संदर्भात बोलताना शर्लिन चोप्राने तिच्या जीवनात घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. "ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले त्यानेच तिच्याकडे 'कपडे काढ आणि न्यूड वॉक करून दाखव' अशी धक्कादायक मागणी केल्याची तिने सांगितले आहे. "दिलसे चाहता था उसे, लेकिन उसने इज्जत की वाट लगा दी" असे म्हणत शर्लिन चोप्राने तिच्या जीवनात घडलेला अनुभव सांगायला सुरुवात केली. परंतु, काहीदिवसापूर्वी न्यूड कॅटवॉक करायला सांगणारा तिचा हाच बॉयफ्रेन्ड आता तिच्याकडे काम करत असल्याचेही शर्लिनने या व्हिडिओत सांगितले आहे. तिच्या आयुष्यात घडलेले असे अनेक किस्से या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत, असेही शर्लिन म्हणाली आहे.

व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

#thelastwish coming soon! 😈

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

याआधी पॉर्नस्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओन हीच्या जीवनावर आधारीत चित्रपट आला होता. अनेकांनी या सिनेमाला पसंती दाखवली होती. सध्या अनेक दिग्दर्शकसह चित्रपट निर्माते बायोपिक सिनेमावर भर देताना दिसत आहे.