Vikrant Massey Not Retiring: 'लोकांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला'; चित्रपटातून निवृत्तीच्या चर्चांवर विक्रांत मॅसीचे स्पष्टीकरण

कामाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरही दिसून येत आहे. त्यामुळेच त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Vikrant Massey (Photo Credits: Instagram)

Vikrant Massey Not Retiring: ने (Vikrant Massey) काल सोमवारी पोस्ट शेअर केली. त्यातून अनेकांनी तो चित्रपटातून निवृत्ती घेत असल्याचे म्हटले. पोस्टमध्ये अभिनेत्याने त्याचे शेवटचे दोन चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली. विक्रांतने इंडस्ट्रीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले गेले. मात्र, आता अभिनेत्याने त्याच्या पोस्टचे (Vikrant Massey Post)सत्य उघड केले आहे. आपण इंडस्ट्रीतून निवृत्ती घेत नसल्याचेही त्याने सांगितले. लोकांनी चुकीचा अर्थ लावला असे विक्रांत मॅसीने म्हटले.

लोकांनी चुकीचा अर्थ लावला

विक्रांत मॅसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, लोकांनी त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. तो इंडस्ट्री सोडत नाहीये. तो काही काळ कामातून ब्रेक घेत आहे. तो सततच्या कामामुळे थकला आहे. कामाचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवरही दिसून येत आहे. त्यामुळेच त्याने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विक्रांतला तब्येतीची समस्या

विक्रांत मॅसी मुलाखतीत म्हणाला की, मी फक्त थकलो आहे आणि मला सध्या दीर्घ विश्रांतीची गरज आहे. मला घराची खूप आठवण येते आणि माझी तब्येतही बिघडू लागली आहे. लोकांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला. आता विक्रांतचे हे वक्तव्यही चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

विक्रांत मॅसीची पोस्ट

अभिनेच्याने सोमवारी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'नमस्कार, गेली काही वर्षे आणि त्यापूर्वीचा काळ खूप छान होता. तुमच्या पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. पण जसजशी मी पुढे जात आहे तसतसे मला जाणवत आहे की आता एक पती, वडील आणि मुलगा तसेच एक अभिनेता म्हणून स्वतःवर पुन्हा ताबा मिळवण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे. त्याने पुढे लिहिले की, 'म्हणून येत्या 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटच्या वेळी भेटू. जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही. शेवटचे २ चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. सर्व काही आणि दरम्यान घडलेल्या सर्व गोष्टींसाठी पुन्हा धन्यवाद. कायमचे कृतज्ञ



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif