Twinkale Khanna On Kashmir File: ट्विंकल खन्नाने 'द काश्मीर फाइल्स'ची उडवली खिल्ली, म्हणाली आता मी सुध्दा 'नेल फाइल्स' चित्रपट बनवणार

ट्विंकल खन्नाने म्हणाली विनोद अग्निहोत्रीशी बरोबरी साधण्यासाठी इतर चित्रपट निर्माते इतर शहरांच्या नावावर चित्रपटांची नावे नोंदवण्यासाठी कशी धावपळ करत आहेत हे सांगितले.

Twinkale Khanna (Photo Credit - Instagram)

विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर लोकांच्या हृदयातही दहशत निर्माण केली आहे. काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असून या चित्रपटाने आतापर्यंत म्हणजे 22 दिवसांत 237.35 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने (Twinkale Khanna) 'द काश्मीर फाइल्स'वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या एका ताज्या वक्तव्याने त्यांनी विवेक अग्निहोत्रीच्या या चित्रपटाच्या क्रेझवर भाष्य केले आहे आणि एक विनोदही केला आहे. ट्विंकल खन्नाने म्हणाली विनोद अग्निहोत्रीशी बरोबरी साधण्यासाठी इतर चित्रपट निर्माते इतर शहरांच्या नावावर चित्रपटांची नावे नोंदवण्यासाठी कशी धावपळ करत आहेत हे सांगितले.

‘द काश्मीर फाईल्स’नंतर आता नव्या शीर्षकांसाठी चढाओढ 

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या स्तंभात ट्विंकलने लिहिलं की कशाप्रकारे इतर दिग्दर्शक आता ‘साऊथ बॉम्बे फाईल्स’, ‘अंधेरी फाईल्स’ यांसारख्या नावांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून त्यांनासुद्धा ‘द काश्मीर फाईल्स’सारखं यश मिळवता येईल. ‘एका निर्मात्याच्या ऑफिसमध्ये मिटींगदरम्यान मला अशी माहिती मिळाली की ‘द काश्मीर फाईल्स’नंतर आता नव्या शीर्षकांसाठी चढाओढ सुरू झाली आहे.

ट्विंकल खन्नाने लिहिले आहे की, 'निर्मात्याच्या कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान मला माहिती मिळाली की 'द काश्मीर फाइल्स'ला श्रद्धांजली वाहण्यासाठी नवीन चित्रपटांच्या शीर्षकांचा पूर आला आहे. चित्रपटाला ट्रिब्यूट म्हणून नवीन टायटल्सची नोंदणी केली जात आहे. मोठ्या शहरांवर आधीच हक्क सांगितला जात असल्याने, आता गरीब लोक अंधेरी फाइल्स, खार-दांडा फाइल्स आणि अगदी साऊथ बॉम्बे फाइल्स अशी नावे नोंदवत आहेत. माझे सहकारी अजूनही स्वत:ला चित्रपट निर्माते म्हणवून घेऊ शकतात का, किंवा या सर्व दाखल्याने ते खरे राष्ट्रवादी मनोज कुमार यांच्यासारखे कारकून बनले आहेत, असा प्रश्न मला पडतो. (हे देखील वाचा: 'द काश्मीर फाइल्स'चे स्क्रीनिंग व्हायला नको होते, भाजप देशातील वातावरण विषारी करत आहे - शरद पवार)

मी सुध्दा 'नेल फाइल्स' नावाचा चित्रपट बनवणार

ट्विंकल खन्नाने पुढे गंमतीत लिहिले की, तीसुद्धा आता 'नेल फाइ्स' नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहे. या चित्रपटाची कल्पना तिने आई डिंपल कपाडियासोबत शेअर केल्याचे ट्विंकलने लिहिले आहे. जेव्हा डिंपल कपाडियाने विचारले की हे विनाशकारी मॅनिक्युअर नाही का, तेव्हा ट्विंकलने तिला सांगितले की हो, हे होऊ शकते परंतु जातीयवादाच्या शवपेटीमध्ये शेवटचा खिळा ठोकण्यापेक्षा हे खूप चांगले आहे.