Zee Yuva घेऊन येतंय नवीन मालिका प्रेम पॉयजन पंगा; पाहा या ट्विस्टवाल्या लव्हस्टोरीची झलक (Watch Video)

येत्या 28 ऑक्टोबर पासून "प्रेम पॉयझन पंगा" ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पाहायला मिळणार आहे

Prem Poison Panga (Photo Credits: Instagram)

झी युवा (Zee Yuva) वाहिनीवरील  फ्रेशर्स (Freshers) पासून ते फुलपाखरू (Phulpakhru)  पर्यंत अनेक मालिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. अशातच आता एक नवी कोरी मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. येत्या 28 ऑक्टोबर पासून "प्रेम पॉयजन पंगा" ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पाहायला मिळणार आहे. नुकतेच या मालिकेचे प्रोमो लाँच करण्यात आले, त्यावरून तरी ही एक लव्हस्टोरी असणार हे दिसत आहे, पण यात एक भन्नाट ट्विस्ट असणार आहे आणि हा ट्विस्ट काय आहे याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत करण बेंद्रे (Karan Bendre) आणि शरयू सोनावणे (Sharyu Sonawane) पाहायला मिळणार आहेत.

मालिकेच्या प्रोमोमध्ये एक मुलगी घरातील एसी बंद असल्याने, फ्रिजमध्ये बसून तिच्या बॉयफ्रेंड बद्दल बोलत असते यावेळी निळ्या रंगात चमकणारे, त्या तरुणीचे डोळे पाहून, या मालिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. तर अलीकडे आलेल्या दुसऱ्या प्रोमो मध्ये या मुलीचा बॉयफ्रेंड आणि ती दोघेही एका हॉटेल मध्ये दाखवले आहेत, यात हा मुलगा मुलीने उष्टे केलेले ग्लास तोंडाला लावताच त्याला चक्कर येते.

पहा प्रेम पॉयझन पंगा चा प्रोमो

 

View this post on Instagram

 

I am extremely delighted to inform you all about my upcoming Serial..Prem Poison Panga...only on Zee Yuva...!! ❤ #Staytuned #zeeyuva 💫

A post shared by Karan Bendre (@bendre.karan) on

ही मालिका फुलपाखरू मालिकेच्या जागी सुरु होणार आहे त्यामुळे प्रेक्षकांचे लाडके मानस वैदही रजा घेणार असले, तरी त्याजागी प्रेक्षकांना नवीन मनोरंजन मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

Hey guys!!!! I am very glad to share the new promo of my upcoming serial Prem Poison Panga. Hope you all like it 😊😇... 28 October 2019 Monday - Saturday 8:30 pm #prempoisonpanga #zeeyuva #kotharevision #staytuned #karanbendre #sharayusonawane

A post shared by Karan Bendre (@bendre.karan) on

याआधी झी मराठी वाहिनीवर देखील अशाप्रकारची मालिका 'जागो मोहन प्यारे' येऊन गेली होती, तसेच आता सुरु असणाऱ्या भागो मोहन प्यारे मध्ये सुद्धा भूत आणि माणसाची प्रेम कथा दाखले जात आहे. सध्या तरी ही मालिका सुद्धा असाच विषय घेऊन अतयार करण्यात आल्याचे अंदाज बांधले जात आहेत.