कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'विद्या' च्या नमिश तनेजा या अभिनेत्याला शूटिंगदरम्यान लागला विजेचा शॉक, रुग्णालयात उपचार सुरु
या मालिकेमधील विवेक वर्धन ही भूमिका करणारा नमिश तनेजा याच्यासोबत शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे.
हिंदी वाहिनी कलर्सवरील लोकप्रिय कार्यक्रम 'विद्या' मालिकेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या मालिकेमधील विवेक वर्धन ही भूमिका करणारा नमिश तनेजा (Namish Taneja) याच्यासोबत शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे. शूटिंगदरम्यान त्याला शॉक लागल्याचा सीन करायचा होता त्यावेळी त्याला खरोखरच शॉक लागल्या कारणाने त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेलीचक्कर ने दिलेल्या वृत्तानुसार, नमिशसोबत या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात एक सीन शूट करायचा होता ज्यात नमिश अनेकदा शॉक द्यायचा होता. मात्र खोटा सीन शूट करत असताना अचानक त्याला खरोखरच शॉक लागला.
View this post on Instagram
Don’t forget to watch vidya only on @colorstv Monday to Saturday 7pm ..... #allbecauseofmyfans
A post shared by Namish Taneja (@tanejanamish) on
हेदेखील वाचा- सुभाष चंद्रा यांनी दिला 'झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस लिमिटेड'च्या अध्यक्षपदाचा राजीनामा
असा अचानक नमिशला कसा शॉक लागला याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र बेशुद्ध पडलेल्या नमिशला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या चाहत्यांचा जीव टांगणीला लागला असून ते नमिशसाठी प्रार्थना करत आहेत. तो लवकरात लवकर बरा होऊन शूटिंग सुरु व्हावी अशीही चाहत्यांची इच्छा आहे.
नमिश ने 2014 मध्ये डेब्यू केला होता. त्याने आतापर्यंत मैं मायके चली जाऊंगी, स्वरागिनी, एक नई पहचान, प्यार तूने क्या किया, इक्यावन सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.