TikTok च्या नखऱ्यांमुळे दिग्दर्शक त्रस्त, शो मधून 'या' अभिनेत्रीची हकालपट्टी करण्याची शक्यता

या अभिनेत्रीचे टिकटॉकवर प्रचंड फॅनफॉलोअर्स आहेत. या अभिनेत्रीला काही दिग्दर्शक त्यांच्या शो मध्ये घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Photo Credits-Instagram

टीव्हीच्या माध्यमातून चित्रपट आणि टिकटॉक (TikTok) मध्ये प्रसिद्ध झालेली अभिनेत्रीचे नखरे पाहून सध्या एका शो चे दिग्दर्शक त्रस्त झाले आहेत. या अभिनेत्रीचे टिकटॉकवर प्रचंड फॅनफॉलोअर्स आहेत. या अभिनेत्रीला काही दिग्दर्शक त्यांच्या शो मध्ये घेण्यासाठी उत्सुक आहेत. पण याच दरम्यान या अभिनेत्रीचे नखरे पाहून दिग्दर्शकांच्या नाकी नौ आले आले आहेत. याच कारणामुळे या अभिनेत्रीची आता शो मधून हकालपट्टी करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अवनीत कौर (Avneet Kaur) असे अभिनेत्रीचे नाव असून तिने अभिनयाच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये नाव कमवले आहे. तसेच मर्दानी 2 चित्रपटातून सुद्धा अवनीत झळकली होती. सध्या अवनीत ही टीव्ही शो अलादीन मध्ये काम करत असून सिद्धार्थ निगम तिच्यासोबत मु्ख्य भुमिकेत दिसून येत आहे. अलादीन शो मध्ये अवनीत राजकुमारी यास्मीनची भुमिका साकारत आहे. तर स्पॉटबॉय यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार, या शोचे दिग्दर्शक अवनीत कौर हिची शोमधून हकालपट्टी करणार असल्याची शक्यता आहे.

 

View this post on Instagram

 

When you try to dance but you really CANT🙏🏻😭😂 @thesiddharthnigam @badboyshah #Alasmine #ShootMode #BTS

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13) on

असे सांगितले जात आहे की, दिग्दर्शक अवनीत हिच्या सेटवर येणाऱ्या टायमिंगमुळे सुद्धा नाराज आहेत. तसेच अवनीत ही तिची भुमिका करताना त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ही बोलले जात आहे. अलादीन दिग्दर्शक यास्मीन या पात्रासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतल असल्याचे ही बोलले जात आहे.