Suyash Tilak Was Tested COVID-19 Positive: अभिनेता सुयश टिळक ला झाली होती कोरोनाची लागण, आता पूर्ण बरा झाल्याची चाहत्यांनी दिली माहिती

या पोस्टमध्ये आपल्याला कोरोना झाल्याची माहिती देऊन सर्व चाहत्यांना सामाजिक संदेश देखील दिला आहे.

Suyash Tilak (Photo Credits: Instagram)

का रे दुरावा, शुभमंगल ऑनलाईन सारख्या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) याला 20 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाल्याची माहिती सुयशने नुकतीच सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. मात्र आता तो पूर्णपणे बरा झाला कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याचे सुयशने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मी क्वारंटाईन होऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण 20 दिवस उपचार घेऊन आता बरे झालो आहेत असे त्यांनी सांगितले. या पोस्टमध्ये आपल्याला कोरोना झाल्याची माहिती देऊन सर्व चाहत्यांना सामाजिक संदेश देखील दिला आहे.

'गेल्या महिन्यात मला कोरोनाची लागण झाली होती. मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता वा कोरोनाची लक्षणं नव्हती. मात्र कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन तसेच शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करत मी आता बरा झालो असून माझी कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे' असे सुयशने या पोस्टमध्ये म्हटले आहे. हेदेखील  वाचा- Suyash Tilak In Khali Peeli: सुयश टिळक ची बॉलिवूड मध्ये दमदार एन्ट्री, अनन्या पांंडे व ईशान खट्टर च्या खाली पिली मध्ये साकारतोय विलन (PHOTOS)

 

View this post on Instagram

 

I’m okay and I have recovered. Take care of yourself and loved ones. 😇

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

त्याचबरोबर 'लवकरच दिवाळी येणार आहे. त्यामुळे लोकांनी विशेष काळजी घ्या. रस्त्यावर इतरत्र थुंकू नका. ताप, घसा दुखणे, वास न येणे, सर्दी यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा' असा महत्त्वाचा संदेश त्याने या पोस्टमधून दिला आहे.

सुयश टिळक सध्या कलर्स वाहिनीवरील 'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तो शंतनूची भूमिका करत आहे. अभिनेत्रा सायली संजीव त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. सध्या मालिका लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. त्याचबरोबर अलीकडे OTT प्लेटफॉर्म प्रदर्शित झालेल्या 'खाली पिली' या हिंदी चित्रपटात सुयश ने काम केले होते. यात अभिनेता इशान खट्टर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते.