CAA Protest मुळे सुशांत सिंग 'सावधन इंडिया'तून बाहेर? चॅनेलचे विधान खोटे असल्याचा त्याने केला दावा, लवकरच दाखल करणार तक्रार
”चॅनेलचे विधान चुकीचे असून तो सिने अँड टीव्ही आर्टिस्टस असोसिएशन (सीआयएनटीएए) आणि फेडरेशन ऑफ अॅक्टर्स (एफआयए) कडे तक्रार दाखल करीत असल्याचा दावा सुशांत सिंग यांनी या ट्विटला प्रत्युत्तर देताना केला.
Sushant Singh On Leaving Savdhaan India: अनेक वर्षांपासून ‘सावधान इंडिया’ या कार्यक्रमाचे होस्ट म्हणून ओळखले जाणारे सुशांत सिंग यांनी अलीकडेच सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की त्यांना हा शो सोडावा लागत आहे. त्यांच्या ट्विटवर असे लिहिले होते की, “आणि माझा सावधान इंडिया या शोमध्ये कार्यकाळ संपत आहे.” परंतु, त्यामागचे कोणतेही कारण त्यात दिले गेले नाही. नेटीझन्सनी मात्र त्यांनी CAA साठी केलेल्या निषेधही या सर्वच संबंध जोडला आहे. त्यानंतर वाहिनीने एक अधिकृत विधान प्रसिद्ध केले ज्यामध्ये असे म्हटले आहे की सावधान इंडियाच्या पुढील सीझनसाठी होस्टची आवश्यकता नाही आणि म्हणूनच सुशांतसोबत नवीन कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलेले नाही.
चॅनलचे असेही म्हणणे आहे की त्यांचे कोणतेही राजकीय मत नव्हते आणि ते या कॉन्ट्रॅक्टने राजकीय मतांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आता, सुशांत सिंग यांनी दावा केला आहे की चॅनलने दिलेली अधिकृत माहिती ही संपूर्णपणे चुकीची आहे.
सुशांत सिंग यांनी आपल्या नवीन ट्विटमध्ये याचा खुलासा केला. एका ट्विटर युजरने असा दावा केला आहे की सुशांत सिंगला माहित आहे की आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आहे आणि म्हणूनच त्याने हे नाटक करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, सुशांतसिंग यांना माहित आहे की त्यांचा करार संपत आहे आणि सावधान इंडियाच्या नव्या स्वरूपात या कथेत भाष्य करणारे पोलिस असतील. म्हणून त्याने हे नाटक करून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तो असं भासवायचा प्रयत्न करत आहे की जणू काय त्याला शो मधून काढून टाकण्यात आले कारण तो NRC विरूद्ध बोलला आहे.
”चॅनेलचे विधान चुकीचे असून तो सिने अँड टीव्ही आर्टिस्टस असोसिएशन (सीआयएनटीएए) आणि फेडरेशन ऑफ अॅक्टर्स (एफआयए) कडे तक्रार दाखल करीत असल्याचा दावा सुशांत सिंग यांनी या ट्विटला प्रत्युत्तर देताना केला.