बिग बॉस मराठी फेम स्मिता गोंदकर ने पाण्यात केले बोल्ड फोटोशूट (Photos Inside)
Smita Gondkar (Photo Credits: Instagram)

Smita Gondkar Bold Photos: मराठी अभिनेत्री व बिग बॉस मराठी फेम स्मिता गोंदकर तिच्या सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांसोबत कनेक्टड असते. बोल्ड फोटो, नवीन प्रोजेक्ट्स, व दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती तिच्या फॅन्स सोबत शेअर करत असते. बोल्ड लुकसाठी प्रसिद्ध असणाऱ्या स्मिताने नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. स्मिताने स्विमसूट मध्ये हे फोटोशूट केले आहे.

स्मिता पोहण्यामध्ये चॅम्पियन आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण तिने अनेक पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तिच्या या नव्या फोटोशूटमध्ये ती स्विमिन्ग पूलच्या बाजूला पोझ देताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा स्विमसूट परिधान केला असून तिला हा लुक खूपच शोभून दिसत आहे.

पहा समितीचे काही फोटो,

हिरव्या साडीत खुलून आले हॉट अभिनेत्री स्मिता गोंदकर चे सौंदर्य, पाहा फोटोज

स्मिताने या आधीही अनेकदा बिकिनी शूट केले आहेत. ती कधीही बोल्ड फोटोशूटसाठी लाजत नाही. इतकंच काय तर तिच्या सर्वात प्रसिद्ध असलेल्या 'पप्पी दे पारूला' या गाण्यातही ती थोड्या बोल्ड अंदाजातच आपल्याला दिसते. बिग बॉस मराठीच्या सीझन 1 मध्ये ती स्पर्धक होती. त्यातही तिने बिकिनी परिधान केली होती आणि प्रेक्षकांना तिचा तो अंदाज आवडला देखील. स्मिताचा भोळा स्वभाव प्रेक्षकांना सर्वात जास्त भावला होता. आणि म्हणूनच ती बिग बॉस मराठीच्या फिनाले मध्ये देखील पोहोचली होती. दरम्यान, स्मिता सध्या मराठी सिनेसृष्टीत एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिचे अनेक प्रोजेक्ट्स सध्या सुरु आहेत.