See Photos: अभिनेत्री सुकन्या काळण हिने केले टॉपलेस फोटोशूट
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर, राधिका आपटे, नेहा महाजन यांच्या यादीत आणखी एका अभिनेत्रीने नुकतीच एंट्री घेतली आहे. ती म्हणजे नृत्यांगना सुकन्या काळण.
सुकन्या हिने अनेकदा आपल्या नृत्यातील दिलखेचक अदाकारीने रसिकांना घायाळ केले आहे. परंतु यावेळी तिने रसिकांना तिच्या बोल्ड फोटोशूटने प्रेमात पडले आहे. सुकन्याने काही महिन्यांपूर्वी न्यूड व बोल्ड फोटोशूट केलं आहे. आणि नुकतेच त्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोतील तिच्या अदा पाहून सर्वच चाहते सुकन्यावर फिदा झाले आहेत.
तिचे हे टॉपलेस फोटोशूट सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पाहा त्यातील काही फोटो,
पाहा Ileana D'cruz काय म्हणाली 'सेक्स लाईफ' बद्दल
सुकन्या ही मूळची डोंबिवलीची आहे. तिला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती आणि 'एकापेक्षा एक' या डान्स रिऍलिटी शोमधून सुकन्या घराघरात पोहोचली. शो चे जज महागुरू सचिन पिळगावकर यांनी सुकन्याच्या नृत्याचे अनेकदा कौतुक केले आहे. 'एकापेक्षा एक' या शोनंतर सुकन्या ‘मेनका उर्वशी’ आणि ‘तु का पाटील’ या दोन मराठी चित्रपटात झळकली होती. त्याचसोबत सुकन्याने ‘कन्यादान' आणि ‘या गोजिरवाण्या घरात’ या दोन मालिकांमध्येही काम केलं आहे.