'रामायण' मालिकेचे पुर्नप्रक्षेपण उद्यापासून सुरु होणार- प्रकाश जावडेकर
दूरदर्शन नॅशनल (DD National) वर रोज सकाळी 9 ते 10 आणि रात्री 9 ते 10 असे दोन भाग दाखवले जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसचे देशभरात वाढत चाललेला प्रसार पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन ठेवला आहे. या काळात समस्त देशवासियांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. यात ज्या कर्मचा-यांना शक्य आहे त्यांना 'Work From Home' ची सुविधा देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त अन्य लोक हे घरातच अडकून पडले आहेत. मोकळ्या वेळात लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी लोकांच्या आग्रहास्तव 'रामायण' या मालिकेचे उद्यापासून पुर्नप्रेक्षपण करण्यात येणार आहे. दूरदर्शन नॅशनल (DD National) वर रोज सकाळी 9 ते 10 आणि रात्री 9 ते 10 असे दोन भाग दाखवले जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
देशाच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन लोक अक्षरश: कंटाळली आहेत. बाहेर जाता येत नाही घरात काही तरी मनोरंजनाचे काही कार्यक्रम टीव्हीवर दाखवले जावेत अशी लोकांकडून मागणी येत होती. अशा वेळी छोट्या पडद्याचा एक काळ गाजविणारी आणि घराघरात पोहोचलेली मालिका 'रामायण' पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली आहे. शेतीसाठी विशेष पॅकेज देऊन शेतक-यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करा- शरद पवार
रामानंद सागर निर्मित रामायण सन 1987 मध्ये शुट करण्यात आले होते. तसेच बी. आर, चोपडा निर्मित महाभारताचे शुटिंग सन 1988 मध्ये करण्यात आले होते. प्रथमच विज्ञानाच्या मदतीने छोट्या पडद्यावर भारतीय पौराणिक कथांवरली कार्यक्रम प्रसारित करण्यात आले होते. ज्यामुळे हे शो केवळ जास्तच पाहिले गेले नाहीत तर त्यांची लोकप्रियता आकाशाच्या उंचांपर्यंत गेली.