रात्रीस खेळ चाले 2 मध्ये नाईक वाड्यात वाजणार अण्णा आणि शेवंताच्या लग्नाचे सनई-चौघडे, See Photos

झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) चा बहुप्रतीक्षित अण्णा (माधव अभ्यंकर) आणि शेवंताच्या (अपूर्वा नेमळेकर) लग्नाचा एपिसोड लवकरच प्रदर्शित होणार आहे.सध्या सोशल मीडियावर अण्णा आणि शेवंताच्या लग्नाचे काही फोटो सुद्धा पाहायला मिळत आहेत.

Ratris Khel Chale 2 Anna Shevanta Wedding (Photo Credits: Instagram)

झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले 2 (Ratris Khel Chale 2) चा बहुप्रतीक्षित अण्णा (माधव अभ्यंकर) आणि शेवंताच्या (अपूर्वा नेमळेकर) लग्नाचा एपिसोड लवकरच प्रदर्शित होणार आहे. लॉक डाऊन (Lockdown) च्या अगोदर या कथानकावर येऊन मालिका थांबली होती. तुम्हालाही आठवत असेल की पौर्णिमेला अण्णा आणि शेवंता लग्न करणार असं ठरलं होतं पण नेमकं तेव्हा लॉक डाऊन लागू झालं आणि जवळपास तीन महिने प्रेक्षकांची उत्सुकता तशीच ताणून राहिली. आता अलीकडे जेव्हा मालिका पुन्हा सुरु झाली तेव्हा मालिकेचा फ्लॅशबॅक दाखवला जात होता, मात्र काल पासून नवे भाग सुरु झाले आहेत आणि आता लवकरच हा लग्नाचा भाग दाखवला जाणार आहे. सध्या सोशल मीडियावर अण्णा आणि शेवंताच्या लग्नाचे काही फोटो सुद्धा पाहायला मिळत आहेत.

अपूर्वा नेमळेकर म्हणजेच शेवंता हिने सुद्धा आपल्या इंस्टाग्राम पेज वरून लग्नाच्या साडीतील खास फोटो शेअर केला आहे, या फोटो मध्ये तिने शेवंताचं स्वप्न पूर्ण होणार का असा सवाल केला आहे. मात्र आता व्हायरल होणाऱ्या फोटोज मधून तरी लग्न लागलंय असे अंदाज बांधता येतील.

अपूर्वा नेमळेकर पोस्ट

 

View this post on Instagram

 

स्वप्न शेवंताच होईल का पूर्ण ?‌‌‌??? . . #apurvanemlekar #shevanta #shevantalovers #shevantaswag #shevantacomingsoon

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

अण्णा आणि शेवंता चं लग्न

 

View this post on Instagram

 

अण्णांशी लग्न करून शेवंता वाड्यात प्रवेश करणार, पाहायला मिळणार येणाऱ्या भागात . . . For more updates follow @peepingmoonmarathi . . . #ratriskhelchale2 #shevanta #apurvanemlekar #marathiserial #weeding

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

दरम्यान, लग्नानंतर शेवंता नाईक वाड्यावर येते पण तिथे तिला जागा मिळणार का? यामागे अण्णा नेमकं काय कारस्थान रचत आहे? शेवंताचा खून नेमका कसा होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मालिकेचे येणारे भाग पाहावे लागतील.