शनाया परतणार! माझ्या नवर्‍याची बायको सीरीयल मध्ये रसिका सुनील ची पुन्हा एंट्री

झी मराठी (Zee Marathi) वरील मालिका माझ्या नवर्‍याची बायको (Mazya Navryachi Bayko) मधील सर्वात गाजलेलं पात्र म्हणजेच शनाया साकारलेली अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil)  पुन्हा एकदा मालिकेत एंट्री करणार असल्याचे समजत आहे.

Rasika Sunil Re Entry In Mazya Navryachi Bayko (Photo Credits: instagram)

झी मराठी (Zee Marathi) वरील मालिका माझ्या नवर्‍याची बायको (Mazya Navryachi Bayko) मधील सर्वात गाजलेलं पात्र म्हणजेच शनाया साकारलेली अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil)  पुन्हा एकदा मालिकेत एंट्री करणार असल्याचे समजत आहे. जुनी शनाया परतणार असल्याने आता लॉकडाउन नंंतर जेव्हा मालिका पुन्हा सुरु होतील तेव्हा प्रेक्षकांना चांगलेच गिफ्ट मिळणार आहे. रसिकाने चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी जय मल्हार मालिकेतुन घराघरात पोहचलेला बानुबया चा चेहरा म्हणजेच अभिनेत्री इशा केसकर (Isha Keskar) हिच्याकडे हा रोल गेला होता, मात्र आता इशा सुद्धा वैयक्तिक कारणातुन मालिका सोडणार असल्याने हा रोल पुन्हा एकदा रसिकाकडेच जाणार असल्याचे समजत आहे. Rasika Sunil Bikini Photos: रसिका सुनील चे Ultra Hot बिकिनी फोटोशूट; इंस्टाग्राम वर लावतेय आग

मागील तीन महिन्यात सर्वच मालिकांचे शुटींग लॉकडाउन मुळे बंंद होते. काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुन्हा एकदा मालिकांच्या शुटींगला परवानगी दिली होती.त्यानुसार माझ्या नवर्‍याची बायको चे शुटींग जरी सुरु झाले असले तरी, शनाया म्हणजेच रसिका पुन्हा नेमकी कधी दिसणार याबाबत मालिकेच्या टीम कडुन काहीही सांगण्यात आलेले नाही.

रसिका सुनील पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

दरम्यान मालिका सोडल्यावरही रसिका सुनील चांगलीच चर्चेत होती. जीम मधले फोटो पोस्ट करुन कधी फिटनेस गोल दाखवत तर कधी स्वीमिंग पूल मध्ये बिकिनी घालुन, बोल्ड फोटोशुटची झलक शेअर करुन रसिका ऑनलाईन बरीच अ‍ॅक्टिव्ह झाली होती.