रामायण मालिकेत 'रावण' साकारलेल्या अरविंद त्रिवेदी यांचे ट्विटरवर आगमन; चाहत्यांनी #RavanOnTwitter ट्रेंडसह केले जोरदार स्वागत (View Tweets)
18 एप्रिल रोजी त्यांनी आपले ट्विटर अकाऊंट ओपन केले. 84 वर्षीय अरविंद यांच्या ट्विटर आगमन होताच चाहत्यांनी जोरदार स्वागत केले.
कोरोना व्हायरस दहशतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात दूरदर्शनवर अनेक जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु करण्यात आल्या. 'रामायण' या लोकप्रितेचा उच्चांक गाठलेल्या मालिकेला प्रेक्षकांनी आता ही उदंड प्रतिसाद दिला. या मालिकेमुळे दूरदर्शनने सर्व चॅनेल्सला मागे टाकत टीआरपीचे रेकॉर्ड्स मोडले. कालच रामायण मालिकेचा शेवटचा एपिसोड 'रावण वध' टेलिकास्ट झाला. रामायण मालिकेतील राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्यासह रावणाची भूमिका देखील लोकप्रिय ठरली होती. ही भूमिका अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी साकारली होती. त्यांच्या अभिनयाचे कौतुक आताही केले जाते.
'रावण' या व्यक्तिरेखेला मिळणारे प्रेम आणि सध्या 'रामायण' मालिकेचा असणारा ट्रेंड यानंतर अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी ट्विटरवर प्रवेश केला. 18 एप्रिल रोजी त्यांनी आपले ट्विटर अकाऊंट ओपन केले. 84 वर्षीय अरविंद यांच्या ट्विटर आगमन होताच चाहत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे #RavanOnTwitter या ट्विटर ट्रेंडसह त्यांचे स्वागत करण्यात आले. (Ravan Vadh Memes: 'रावण वधा'ने रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने घेतला निरोप; सोशल मीडियामध्ये मीम्स व्हायरल)
पहा रावण साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांचे स्वागत करणारे ट्विट्स:
सध्या त्यांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. त्यात अरविंद त्रिवेदी दूरदर्शनवर रामायणाचे पुनःप्रसारण पाहताना दिसत आहेत. त्यात त्यांचा म्हणजेच रावणाचा सीन सुरु आहे. त्यात ते सीतेचे अपहरण करताना दिसत आहेत.