Aashram Ban: नेटीझन्सनी सोशल मीडियावर केली प्रकाश झा यांच्या 'आश्रम' वेब सीरिजवर बंदी घालण्याची मागणी; जाणून घ्या काय आहे यामागचं कारण
पहरण, गंगाजल आणि आरक्षणसारख्या सामाजिक विषयांवर चित्रपट बनवणारे प्रकाश झा (Prakash Jhas) सध्या ओटीटीवर आपली वेब सीरिज 'आश्रम' (Aashram) मुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
Aashram Ban: अपहरण, गंगाजल आणि आरक्षणसारख्या सामाजिक विषयांवर चित्रपट बनवणारे प्रकाश झा (Prakash Jhas) सध्या ओटीटीवर आपली वेब सीरिज 'आश्रम' (Aashram) मुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एमएक्सप्लेअरवरील लॉकडाऊन दरम्यान त्यांची वेब सीरिज आश्रम प्रदर्शित झाली. या वेब सीरिजच्या माध्यमातून बॉबी देओलने वेब सीरिज विश्वात प्रवेश केला. या मालिकेला प्रचंड यश मिळाल्याचा दावादेखील करण्यात आला होता. आता या वेब सीरिजचा दुसरा सीझन नोव्हेंबरमध्ये येत आहे. मात्र, सोशल मीडियावर यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, 28 ऑक्टोबरला ट्विटरवर #PrakashJhaAttacksHinduFaith नावाचा ट्रेंड आला होता. त्यावर नेटीझन्सनी ट्विट केले होते. प्रकाश झा आपल्या वेब सिरीजच्या मदतीने विशिष्ट धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच जाणीवपूर्वक संत-महात्म्यांच्या प्रतिमेला कलंक लावण्याचा प्रयत्न करीत आहे, असं म्हणत नेटीझन्सनी आश्रम वेब सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा - Shraddha Kapoor Trolled: श्रद्धा कपूर बनणार इच्छाधारी 'नागिन'; चित्रपटाच्या घोषणेनंतर नेटीझन्सनी अभिनेत्रीला ट्रोल करत बनवले मजेशीर Memes)
आश्रम वेब सीरिजचा पहिला टीझर रिलीज झाल्यापासून यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. पहिल्या सीरिजनंतर सोशल मीडियावर लोकांचा रोष दिसून आला होता. तथापि, वेब सीरिजच्या पहिल्या सीझनच्या ट्रेलरच्या अगोदर एक डिस्केलमर देखील जारी करण्यात आले होते. ज्यामध्ये निर्मात्यांनी सांगितले होते की, ते संत महात्म्यांच्या परंपरेवर विश्वास ठेवतात. या मालिकेची कथा काल्पनिक आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावण्याची त्यांचा विचार नाही.
काय आहे आश्रम वेब सीरिजची कथा -
आश्रम वेब सीरिजची कथा एका काल्पनिक बाबांच्या अवती-भोवती फिरणारी आहे. या वेब सीरिमध्ये बाबा निरालापुर काशीपुरची भूमिका बॉबी देओल यांनी केली आहे. यातील काही भागात बाबा अतिशय शक्तिशाली असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यांच्या भाविकांची संख्या मोठी आहे. या बाबाकडे राजकीय शक्तीही दाखवण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)