Masterchef India चा नवा सीझन लवकरच रसिकांच्या भेटीला येणार; 19 ऑगस्टला मुंबईत ऑडिशन्स

खवय्ये आणि पदार्थ बनवून खायला घालायला आवडणार्‍यांसाठी हा Masterchef India रिअ‍ॅलिटी शो एक मोठं व्यासपीठ आहे.

Food प्रतिकात्मक फोटो (PC - Pixabay)

स्वयंपाकाची आवाड असणार्‍यांमध्ये 'Masterchef India' ची प्रचंड क्रेझ आहे. आता या फूड रिअ‍ॅलिटी शो चा नवा सीझन लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. भारतामध्ये कोलकाता आणि दिल्ली पाठोपाठ मुंबई ऑडिशन साठी सज्ज झाली आहे. 19 ऑगस्टला मुंबई मध्ये 'Masterchef India' साठी ऑडिशन मुंबई शहरात पार पडणार आहेत. खवय्ये आणि पदार्थ बनवून खायला घालायला आवडणार्‍यांसाठी हा रिअ‍ॅलिटी शो एक मोठं व्यासपीठ आहे.

मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्‍कूल (आयसीएसई), वास्‍तू पार्क, ऑफ लिंकिंग रोड, मालाड, एव्‍हरशाइन नगर, मालाड पश्चिम, मुंबई ४०००६४ या ठिकाणी या ऑडिशनचं आयोजन करण्यात आलं आहे. आपल्या पाककौशल्याच्या जोरावर या रिअ‍ॅलिटी शो मध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’ला भारतीय प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतलं होतं. त्यानंतर 'मास्टर शेफ इंडिया' ची सुरूवात झाली. नव्या सीझनसाठी आता ऑडिशन सुरू आहेत. यंदाच्या सीझन मध्ये रणवीर ब्रार आणि विकास खन्ना हे लोकप्रिय शेफ पुन्हा परीक्षकांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. हा शो सोनी लिव्ह वर पाहता येणार आहे.