Mafia Trailer: अभिनेता नमित दास ची थ्रिलर वेब सिरिज 'माफिया' चा ट्रेलर प्रदर्शित; Watch Video

या वेब सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. माफिया वेब सिरिजचा प्रीमियर 10 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरिजच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना मित्रांच्या रीयूनियनची झलक दाखवण्यात आली आहे.

माफिया पोस्टर(Photo Credits: Instagram)

Mafia Trailer: झी 5 (ZEE5) चॅनलवर लवकर एक मानसशास्त्र थ्रिलर 'माफिया' (Mafia) वेब सिरिज (Web Series) प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. माफिया वेब सिरिजचा प्रीमियर 10 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरिजच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना मित्रांच्या रीयूनियनची झलक दाखवण्यात आली आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला मित्रांचा एक ग्रुप जंगलात जातो. हा ग्रुप 'माफिया' नावाचा सोशल डिडक्शन चा गेम खेळण्यास सुरुवात करतात. या ट्रेलच्या माध्यमातून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना एक रहस्यमय कथा आणि मनोवैज्ञानिक थ्रिलर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यात 6 जणांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे. (हेही वाचा - Saroj Khan No More: सरोज खान यांच्या निधनाची बातमी ऐकून अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला दु:ख झाले अनावर; ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना)

या वेब सिरिजमध्ये हे 6 जण माफिया खेळापासून स्वत: ला कसं वाचवतात? तसेच खऱ्या माफियाला कसं शोधतात? हे रहस्य या वेब सिरिजमध्ये उलगडण्यात आलं आहे. 'माफिया' वेब सिरिजचा ट्रेलर लाँच झाल्यानंतर अभिनेता नमित दास (Namit Das) ने सांगितलं की, 'माफिया' वेब सिरिज ही रहस्य आणि मानसशास्त्र थ्रिलरचं योग्य मिश्रण आहे. जीवनाच्या या खेळामध्ये कोण वाचणार आणि कोण एकमेकांच्या विरोधात उतरणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 10 जुलैला झी 5 वर शो पाहावा लागेल. ही वेब सिरिज प्रदर्शित झाल्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रियेची मी वाट पाहत आहे,' असंही नमित दास ने म्हटलं आहे.

ही वेब सिरिज लोकप्रिय सोशल डिडक्शन बोर्ड गेम 'माफिया' वर आधारित आहे. या वेब सिरिजचे निर्देशन बिरसा दासगुप्ता यांनी केलं असून SK मुव्हीज द्वारा निर्मित करण्यात आली आहे. या वेब सिरिजची रचना रोहन घोष व अरित्रा सेन यांनी केली आहे. हा शो येत्या 10 जुलैला झी5 वर प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे.