Kamala Thoke Passes Away: लागिरं झालं जी फेम 'जिजी', अभिनेत्री कमला ठोके यांचे कर्करोगाने निधन
त्या 74 वर्षांच्या होत्या
झी मराठी वरील मालिका 'लागिरं झालं जी' फेम जिजी चं पात्र साकारणार्या अभिनेत्री कमला ठोके (Kamala Thoke) यांचे काल (14 नोव्हेंबर) निधन झाले आहे. त्या 74 वर्षांच्या होत्या. बंगळूरू येथे त्यांच्यावर कॅन्सरचे (Cancer) उपचार सुरू असतानाच त्यांना देवाज्ञा झाली. मूळच्या शिक्षकी पेशाच्या कमला ठोके निवृत्तीनंतर पुन्हा कलाक्षेत्राकडे वळल्या होत्या. सध्या त्या 'देवमाणूस' मालिकेतही काम करत होत्या. मात्र काही महिन्यांपासून त्यांची कर्करोगासोबतची झुंज सुरू होती.
कमला ठोके शिक्ष्हिक आणि मुख्याध्यापिका होत्या. शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी काही चित्रपटातदेखील काम केले होते. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये त्या सहभागी होत असे. 'सखा भाऊ पक्का वैरी', बरड, भरला मळवट, कुंकू झालं वैरी अशा सिनेमांमध्येही त्यांनी कामं केली होती. 33 वर्ष शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर 2015साली त्या निवृत्त झाल्या होत्या. डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते सातारा जिल्हा परीषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. Karbhari Lay Bhari Serial: झी मराठी वर लवकरच प्रसारित होणा-या 'कारभारी लय भारी' मालिकेतील या अभिनेत्याने 'लागिर झालं जी' मध्ये केले होते काम.
दरम्यान बंगलूरू येथे त्यांचं काल निधन झाल्यानंतर आज कर्हाडमध्ये त्यांचं पार्थिव आणले जाणार आहे. त्यानंतर सकाळी कमळेश्वर मंदिराशेजारी असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील,