Exclusive: 'या' कारणामुळे Isha Keskar साजरा करणार नाही तिचा वाढदिवस
परंतु या स्पेशल दिवशी तिने कोणतंही सेलिब्रेशन न करण्याचं ठरवलं आहे.
मराठी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री इशा केसकर हिचा आज 28 वा वाढदिवस आहे. परंतु या स्पेशल दिवशी तिने कोणतंही सेलिब्रेशन न करण्याचं ठरवलं आहे.
LatestLY मराठी ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत इशा म्हणाली, "मी या वर्षी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. माझं माझ्या मांजरीवर प्रचंड प्रेम होतं. परंतु काहीच दिवसांपूर्वी तिचं निधन झाल्यामुळे वाढदिवस साजरा करण्याचा माझा अजिबात मूड नाहीये."
"मी फक्त आई, बाबा आणि ऋषी यांच्यासोबत बाहेर जेवायला जाणार आहे," असं देखील ती म्हणाली.
तिच्या स्पेशल बर्थडे गिफ्ट विषयी सांगताना इशा म्हणाली, "प्रत्येक बर्थडेला मला स्पेशल गिफ्ट्स मिळत असतात. पण या बर्थडेचं स्पेशल गिफ्ट मला दिलंय ऋषीने. त्याने माझ्या नकळत माझ्या आई-बाबांना पुण्याहून मुंबईत बोलावलं आहे. खरं तर त्याच्यामुळेच मी आज आई-बाबांसोबत आजचा दिवस स्पेंड करता येणार आहे."
इशाचं मालिकांमधील करियर पाहता, तिने साकारलेली 'जय मल्हार' मालिकेतील बानूबया सारखी गावरान भूमिका जितकी प्रसिद्ध झाली तितकीच तिची 'माझ्या नवऱ्याचं बायको' या शोमधील वेंधळी आणि स्टायलिश शनाया ही भूमिकेदेखील प्रेक्षकांना आवडत आहे.
तिचं लव्ह लाईफ पाहता, ती काही दिया परदेशी फेम ऋषी सक्सेना या अभिनेत्याला देत करत आहे आणि लवकरच हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.