Dolly Bindra ने अनोळखी फोन नंबर वरून Harassment Calls येत असल्याने ट्वीटर वर मागितली मुंबई पोलिसांकडे मदत

एक व्यक्ती डॉलीला सतत फोन करून त्रास देत असल्याने आता डॉली बिंद्रा मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) दरबारी पोहचली आहे.

डॉली बिंद्रा (Photo Credits: Instagram/Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री डॉली बिंद्रा (Dolly Bindra)आपल्या बेधडक अंदाजासाठी आणि वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेमध्ये असते. कोणत्याही विषयावर बिनधास्त वक्तव्य करण्याच्या तिच्या अंदाजामुळे अनेकदा ती लोकांच्या निशाण्यावर असते. अशातच आता पुन्हा डॉली बिंद्रा चर्चेमध्ये आली आहे. एक व्यक्ती डॉलीला सतत फोन करून त्रास देत असल्याने आता डॉली बिंद्रा मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) दरबारी पोहचली आहे. डॉलीने एक स्क्रीन शॉर्ट शेअर करत तिला त्रास देणार्‍या व्यक्तीचा नंबर जाहीर केला आहे. त्याबाबतची तक्रार देखील तिने पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

डॉली बिंद्राने ट्वीटर अकाऊंटवरून नंबर प्रसिद्ध करत कॉल डिटेल्स प्रसिद्ध केले आहे. यामध्ये मुंबई पोलिस आणि पोलिस कमिशनर यांनादेखील टॅग केले आहे. याबाबत लिहताना डॉली बिंद्राने सातत्याने फोन करून तिला त्रास दिला जात असल्याचं म्हटलं जात आहे.

Dolly-Bindra-Twitter

डॉली बिंद्रा यांच्या ट्वीटला मुंबई पोलिसांकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. तिला नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याचं आवाहन केले आहे. डॉली बिंद्रा अनेक दिवसांपासून ग्लॅमर वर्ल्ड पासून दूर आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा अभिनेता जावेद हैदरने भाजी विकण्याचा एक टिकाटॉक व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा डॉली बिंद्रा चर्चेमध्ये आली होती. दरम्यान जावेदने तो व्हिडिओ मज्जा मस्तीमध्ये बनवला होता. डॉली बिंद्रा काही वर्षांपूर्वी बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये देखील झळकली होती.