DD वरील उत्तर रामायण आणि श्रीकृष्ण मालिकांमध्ये 'स्वप्नील जोशी 'असा' ठरला एक समान धागा
हा धागा म्हणजे मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi)
90च्या शतकात रामायण (Ramayan), उत्तर रामायण (Uttar Ramayan), महाभारत (Mahabharat) , श्री कृष्णा (Sri Krishna) अशा अनेक धार्मिक मालिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. मागील काही दिवसात लॉक डाऊन (Lockdown) असल्याने सर्वच मालिका, चित्रपटांचे शूटिंग बंद आहे यावेळी याच जुन्या मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा प्रक्षेपित करण्यात येत आहेत. या मालिकांनी पुन्हा सुरु झाल्यापासून अनेक नवे रेकॉर्ड देखील बनवले आहेत. रामायण आणि महारभारताच्या नंतर आता उद्या 3 मे पासून रोज रात्री 9 वाजता श्रीकृष्ण ही मालिका देखील पुन्हा सुरु होत आहे. अन्य मालिकांप्रमाणेच या मालिकेला सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळेल असे म्हणायला हरकत नाहीत तत्पूर्वी या मालिकेविषयीची एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण जाणून घेऊयात. जर तुम्ही नीट पाहिलेत तर रामायणाच्या नंतर प्रदर्शित झालेल्या उत्तर रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांमध्ये एक समान धागा पाहायला मिळतो. हा धागा म्हणजे मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi).Sri Krishna on Doordarshan On Air Time & Schedule: दूरदर्शन वर उद्या पासून 'या' वेळात अवतरणार श्रीकृष्ण! प्रकाश जावडेकर यांचे ट्विट
स्वप्नील जोशी याने 1988 मध्ये उत्तर रामायणात कुश ही भूमिका साकारली होती. रामाचा पुत्र कुश साकारत स्वप्नील कलाविश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर 1993 साली जेव्हा श्रीकृष्ण मालिका सुरु झाली तेव्हा या मालिकेत स्वप्नीलने तरुणपणीचा कृष्ण साकारला होता. त्यामुळे या दोन्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारून स्वप्नील जोशी हा या मालिकांमधील समान धागा ठरतो.
अलिकडे स्वप्निलने एका मुलाखतीत त्याने सांगितले की, "जेव्हा मी कृष्णाची भूमिका केली तेव्हाचा पूर्ण काळच वेगळा होता. लोक तुमच्या भूमिकेला खरोखरच देव मानायचे. त्यावेळी मी 16 वर्षांचा होतो आणि लोक येऊन माझ्या पायाला स्पर्श करतात. खरं तर काहींनी आजारी नातेवाईक सुद्धा बरे करण्यासाठी माझ्याकडे आणले होते पौराणिक पात्रे साकारणारे बरेच लोक त्या प्रतिमातून बाहेर येऊ शकले नाहीत. परंतु मला माहित होते की कुठेतरी मी त्यांच्यासाठी कृष्णाचे दर्शन घेण्याचे माध्यम होतो".
दरम्यान, स्वप्निलने कृष्णाचे पात्र साकारताना अतुलनीय लोकप्रियता मिळविली होती. स्वप्निलने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत, पण कृष्णाची भूमिका अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. हे या मालिकेचे आणि अभिनेत्याचे यश म्हणता येईल.