Comedian Raju Srivastav: कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका, जीम करताना ट्रेडमिलवर बेशुद्ध पडले

वय वर्षे 59 असलेले राजू श्रीवास्तव नवी दिल्ली (New Delhi ) येथे जीममध्ये व्यायाम करताना बुधवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका (Comedian Raju Srivastava Suffered a Heart Attack) आला. त्यामुळे ते ट्रेडमिलवरच बेशुद्ध पडले.

Raju Srivastava | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कॉमेडीयन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वय वर्षे 59 असलेले राजू श्रीवास्तव नवी दिल्ली (New Delhi ) येथे जीममध्ये व्यायाम करताना बुधवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका (Comedian Raju Srivastava Suffered a Heart Attack) आला. त्यामुळे ते ट्रेडमिलवरच बेशुद्ध पडले. सध्या त्यांच्यावर एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital ) उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठिक आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथे आज सकाळी जिममध्ये ट्रेडमिलवर धावत असताना श्रीवास्तव खाली कोसळले. दक्षिण दिल्लीतील एका जिममध्ये तो वर्कआउट करत होते. त्यांना तातडीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्ली येथे नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले जाईल. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. (हेही वाचा, Cardiac Arrest While Having Sex: सेक्स करताना कार्डीऐक अरेस्ट, हृदयविकार तज्ज्ञ काय सांगतात? घ्या जाणून)

ट्विट

राजू श्रीवास्तव हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय नाव आहे. हा अभिनेता देशातील सर्वात यशस्वी स्टँड-अप कॉमेडियनांपैकी एक आहे जो अनेक राजकारण्यांच्या नकला करून लोकप्रिय झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif