Complaint against KBC: अमिताभ बच्चन, Sony TV यांच्या विरोधात भाजप आमदाराची पोलिसांत तक्रार, कौन बनेगा करोडपती कार्यक्रमातील प्रश्नावरुन वाद

केबीसी (KBC) या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आमदार पवार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

Amitabh Bachchan, KBC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati ) या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) आणि सोनी टीव्ही (Sony TV) यांच्या विरोदात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप आमदार अभिमन्यु पवार (Abhimanyu Pawar ) यांनी लातूर पोलिसांमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. केबीसी (KBC) या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आमदार पवार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. दरमयान, हिंदू जनजागरण समितीनेही या केबीसी कार्यक्रमातील प्रश्नावरुन आक्षेप व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात 30 ऑक्टोबर रोजी एक प्रश्न विचारण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या धर्मग्रंथाचे दहन केले? असा हा प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरादाखल 'मनूस्मृती', 'भगवतगिता' आणि आणखी इतर दोन धर्मग्रंथांची नावे पर्याय म्हणून देण्यात आली होती. यावरच आमदार अभिमन्यू पवार यांनी आक्षेप घेतला आहे. (हेही वाचा, Amitabh Bachchan Birthday: अमिताभ बच्चन यांच्या 'या' काही डायलॉग्समुळे Big B यांना म्हटले जाते 'Angry Young Man')

अभिमन्यू पवार यांचा आरोप काय?

आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, असा प्रश्न विचारुन केवळ हिंदू धर्मियांचा अपमान करण्याचा उद्देश आहे. प्रश्न विचारुन उत्तरादाखल दिलेल्या पर्यायातही सर्व हिंदू धर्मग्रंथांचाच उल्लेख होता. एकाही इतर धर्मग्रंथाचा त्यात उल्लेख करण्यात आला नाही. या पाठिमागे मोठी कॉन्फीरसी थेअरी (रणनिती) आहे, असा आरोप पवार यांनी केला आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही यांनी या प्रकरणी तत्काळ माफी मागवी, अशी मागणीही आमदार अभिमन्यू पवार यानी केली आहे. अमिताभ बच्चन किंवा सोनी टीव्हीयांच्याकडून मात्र अद्याप कोणत्याीही प्रकारची प्रतिक्रिया पुढे आली नाही. त्यामुळे हे प्रकरण पुढे काय वळण घेते याबाबत उत्सुकता आहे.