Bigg Boss 13 बंद करण्याची मागणी; भाजपा नेत्यासह प्रेक्षकांनी ट्विटर वरून व्यक्त केला संताप, 'हे' आहे कारण
कलर्स वरील वादग्रस्त शो बिग बॉसचे 13 (Bigg Boss Season 13) वे सीझन सुरु झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरत आहे. पण यापैकी बऱ्याच चर्चा या शोच्या विरोधात होत असल्याने हा आता मेकर्सच्या डोक्याला ताप झाला आहे. झालं असं की, शोच्या काही नव्याने बदलेल्या संकल्पना प्रेक्षकांना खटकत आहेत. इतकंच नव्हे तर या शो मधून लव्ह जिहादला (Love Jihad) खतपाणी घातलं जातंय, शो मुळे भारतीय संस्कृतीची विटंबना होत आहे, अश्लीलतेचा खुलेआम प्रसार केला जात आहे असेही आरोप नेटकरी लगावत आहेत. तसेच भाजपचे नेते सत्यदेव पचौरी यांनी सुद्धा ट्विटच्या माध्यमातुन कठोर शब्दात शो वर टीका केली आहे.
बिग बॉस ला होत असलेल्या विरोधाचाच एक भाग म्हणजे ट्विटर वर #UnsubscribeColoursTV, #Boycott_BigBoss, #JehadFelataBigBoss यासारखे हॅशटॅग सुद्धा ट्रेंड होत आहेत. वास्तविक स्पर्धकांनी घरात एंट्री केली त्याच दिवशी शो चा होस्ट सलमान खान याने सर्वाना आपला BFF (बेड फ्रेंड फॉरेव्हर) निवडण्यास सांगितले होते, यानुसार एका बेड वर दोघांना झोपण्याची परवानगी होती, पण यावेळी काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकांना आपल्या सोबत निवडल्यामुळे या संकल्पनेवर असंस्कृतपणाचा आरोप केला जात आहे.
पहा प्रेक्षकांचा संताप
Fans Reaction on Bigg Boss 13: बिग बॉस हाऊस आणि स्पर्धकांविषयी असे रिऍक्ट झाले फॅन्स
भाजप नेता सत्यदेव पचौरी यांनी सुद्धा बिग बॉस विरोधात एक ट्वीट केलं आहे. हे बिग बॉस नसून अस्कृंत लोकांच्या मौजमज्जेचा अड्डा झाला आहे. अशा कार्यक्रमांचा विरोध करून तो बंद करण्याची गरज आहे. मी अजूनपर्यंत एकदाही या कार्यक्रमाचा भाग बघितला नाहीये. पण मला मिळालेल्या माहितीनुसार असे कार्यक्रम समाजात विकृती पसरवतात अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्याची गरज आहे. अशा आशयाचे ट्विट सत्यदेव यांनी केले आहे.
पहा ट्विट
दरम्यान, बिग बॉस मध्ये काही कपल्सच्या अति जवळीकीमुळे आधीच्या पर्वात अशाच टीका झाल्या होत्या. मात्र यावेळेस ही टीका अधिक तीव्र माध्यमातून होत असल्याने शो चे मेकर्स या संदर्भात काही निर्णय घेतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.