Bigg Boss OTT 2: JioCinema वर येत्या 17 जूनपासून सुरु होणार 'बिग बॉस ओटीटी 2'; स्पर्धक म्हणून 'या' नावांची चर्चा, घ्या जाणून
फलक तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीजान खानची बहीण आहे. फलकने अनेक टीव्ही शो केले आहेत.
पुन्हा एकदा रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' (Bigg Boss OTT) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी 'बिग बॉस ओटीटी 2' (Bigg Boss OTT 2) करण जोहर नाही तर, सलमान खान होस्ट करणार आहे. तसेच यावेळी हा शो वूटच्या ऐवजी जिओ सिनेमावर स्ट्रीम होईल. येत्या 17 जून पासून या शोला सुरुवात होणार आहे. निर्मात्यांनी 'बिग बॉस ओटीटी 2' चे अँथम गाणे रिलीज केले आहे, ज्यामध्ये सलमान खानचा आवाज आणि नृत्य पाहायला मिळत आहे.
'बिग बॉस ओटीटी 2' चे अँथम गीत प्रसिद्ध रॅपर रफ्तारने गायले आहे. त्याने त्याचे लेखनही केले आहे तसेच ते संगीतबद्धही केले आहे. 'बिग बॉस ओटीटी 2' गाण्यातही रफ्तारची झलक पाहायला मिळाली आहे.
यंदाच्या या नव्या सिझनसाठी निर्मात्यांनी काही बदल केले आहेत. यावेळी जिओ सिनेमाचे लाइव्ह स्ट्रीमिंग दर्शकांना 1000 तासांहून अधिक लाइव्ह कंटेंट तसेच घरामधील 360-डिग्री कॅमेरा व्ह्यू प्रदान करेल. घरातील काही विशेष कट्सदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. दुसरीकडे, 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' चे कास्टिंग पूर्ण झाले आहे आणि स्पर्धक 15 जूनपर्यंत शोच्या सेटवर प्रवेश करतील. अविनाश सचदेव आणि अभिनेत्री पलक पुरस्वानी ही बिग बॉस OTT 2 ची पहिली पुष्टी झालेली नावे आहेत. रिअॅलिटी शोमध्ये हे दोघे एकत्र दिसणार आहेत. (हेही वाचा: Gadar 2 Teaser: 'गदर 2' चा पॉवर पॅक्ड टीझर रिलीज,सनी देओल पुन्हा दिसला अॅक्शन भूमिकेत)
बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये दिसणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे फलक नाझ. फलक तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीजान खानची बहीण आहे. फलकने अनेक टीव्ही शो केले आहेत. दरम्यान, 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये कोणते स्पर्धक भाग घेतील याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र सध्या अनेक मोठ्या नावांची चर्चा होत आहे. यामध्ये पूजा गौर, पारस अरोरा, उमर रियाझ, मुनावर फारुकी, अंजली अरोरा, महीप कपूर (शनाया कपूरची आई) पासून जिया शंकरपर्यंत अनेक नावे चर्चेत आहेत.