Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महाविजेता? प्रेक्षकांना लागली उत्सुकता

यंदा अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली.

Bigg Boss Marathi 5 Top 6 Finalist | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Bigg Boss Marathi 5 Grand Finale:   ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व अवघ्या 70 दिवसांमध्ये संपणार असून पाचव्या पर्वाचा महाविजेत्याची घोषणा आज केली जाणार आहे.   पाचवं पर्व यंदा 28 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं. सीझनमध्ये एकूण 16 स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात सहभाग घेतला होता. या 16 जणांपैकी अनेक अडचणींवर मात करून फक्त सहा जणांचा घरात शेवटपर्यंत निभाव लागला असून यापैकी कोणीतरी एक या चमचमत्या बिगबॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव यंदा कोरणार आहे.  यंदा अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली. (हेही वाचा - Bigg Boss Marathi 5 जिंकणाऱ्याला मिळणार लाखाचं बक्षीस; ट्रॉफी पाहून सदस्यांचा आनंद गगनात मावेना (Watch Video) )

दरम्यान दरवर्षी अंतिम फेरीत Money Bag उचलून एका सदस्याला घराबाहेर पडण्याची संधी मिळते. यामध्ये ज्या सदस्याला आपल्या विजयाची शक्यता सर्वात कमी असते त्याला बिग बॉसकडून पैसे घेऊन बाहेर पडण्याची ऑफर असते. यावेळी देखील हा टास्क पार पडला असून यंदा ही Money Bag उचलून चौथ्या क्रमांकावर जान्हवीने या स्पर्धेतून माघार घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

पाहा पोस्ट -

यंदा रितेश देशमुख शुटिंगमध्ये व्यस्त असल्याने दोन आठवडे तो भाऊच्या धक्क्यासाठी गैरहजर होता.  आता अखेर 2 आठवड्यांनी खास महाअंतिम सोहळ्यानिमित्त रितेश पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर परतला आहे. रितेश देशमुख एवढे दिवस परदेशात ‘हाऊसफुल 5’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. अखेर दोन आठवड्यांनी आता रितेश पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर उपस्थित राहिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif