Bigg Boss Marathi 3 Date and Time: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी सुरु होणार बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन; समोर आला नवा प्रोमो (Watch Video)

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पहिल्या दोन पर्वांना तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi 3) तिसरे पर्व येऊ घातले आहे. मागच्या वर्षी कोरोना विषाणूमुळे बिग बॉस मराठीचा सिझन सुरु होऊ शकला नव्हता, त्यामुळे आता प्रेक्षक हा नवा सिझन पाहण्यास अतिशय उत्सुक आहेत

Bigg Boss Marathi Season 3 | (Photo credit: Instagram)

अखेर प्रतीक्षा संपली आहे. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पहिल्या दोन पर्वांना तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi 3) तिसरे पर्व येऊ घातले आहे. मागच्या वर्षी कोरोना विषाणूमुळे बिग बॉस मराठीचा सिझन सुरु होऊ शकला नव्हता, त्यामुळे आता प्रेक्षक हा नवा सिझन पाहण्यास अतिशय उत्सुक आहेत. यंदाचा हा सिझन कधी सुरु होईल याबाबत सोशल मिडियावर प्रचंड चर्चा होती, आता कलर्स मराठी वाहिनीकडून त्याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी 3 चा भव्य प्रीमियर 19 सप्टेंबर 2021 रोजी, संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. शोचे दैनिक भाग 9:30 वाजता प्रसारित होती. हा बिग बॉस मराठी 100 दिवस चालणार आहे. यावेळीही महेश मांजरेकर बिग बॉस मराठी 3 चे सूत्रसंचालन करणार आहेत. शोचा प्रोमोही समोर आला आहे, ज्यात महेश मांजरेकर दिसत आहे. महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीचे पहिले दोन सीझन होस्ट केले आहेत. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहेत. ते खूपच स्टायलिश दिसत आहे व त्यांचा लूक चाहत्यांना खूप आवडत आहे. आता तो या नवीन नवीन सिझन व एका वेगळ्या थीमसह लोकांचे मनोरंजन करण्यास तयार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

अभिनेता-चित्रपट निर्माते महेश मांजरेकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते त्यानंतर त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर महेश यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, ते आता घरी विश्रांती घेत आहेत. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर महेश पुन्हा कामावर परतत आहेत. (हेही वाचा: महेश मंजरेकर यांच्यावर Urinary Bladder Cancer च्या निदानानंतर शस्त्रक्रिया, आता प्रकृतीत सुधार; रिपोर्ट्स)

रिपोर्ट्सनुसार यंदा, संग्राम समेल, दीप्ती देवी बिग बॉस मराठी 3 मधील शोचा भाग बनणार आहेत. याशिवाय नेहा खान, सुयश टिळक, रसिका सुनील असे कलाकारही यंदाच्या सिझनमध्ये दिसू शकतात. मात्र, स्पर्धकांबाबत अद्याप कोणतीही पुष्टी देण्यात आलेली नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif